पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

राज्यसभा निवडणूक 2026 पार्थ पवार: आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार (Parth Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. (Maharashtra Politics news)

तसेच 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारीविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. येत्या काही दिवसांमध्ये वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

BJP Rajya Sabha Election candidates: भाजप विनोद तावडेंना राज्यसभेवर पाठवणार?

भाजपकडून राज्यसभेचे आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मंगळवारी रात्री 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार उतरवले जाणार आहेत. यापैकी एका जागेवर रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित आहे. तर इतर तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपच्या आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होईल. या तीन उमेदवारांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 रिक्त जागा, निवडून येण्याचं समीकरण काय? (Maharashtra Rajya Sabha Election 2026)

विधानसभेचे आमदार 286

  • अजित पवार आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनाने 2 जागा रिक्त
  • कोटा = एकूण आमदार (286) भागीले रिक्त जागा 7 + 1 याच्या उत्तरात + 1 मिळवायचे.
  • म्हणजेच = 286 / 8 =35.75
  • 35.75 + 1 = 36.75
  • राज्यसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला  36.75 म्हणजेच 37 मते मिळायला हवीत.

कोणाचे संख्याबळ किती? (Maharashtra BJP Shivsena NCP Congress MLA)

  • भाजप- 132 – 1 = 131
  • शिवसेना (शिंदे गट)- 57
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 – 1 = 40
  • काँग्रेस- 16
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
  • शिवसेना (ठाकरे गट)- 20
  • समाजवादी पक्ष- २
  • जनसुराज्य शक्ती- 2
  • राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
  • राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
  • एमआयएम- 1 जागा
  • सीपीआय (एम)- 1
  • पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
  • राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
  • अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)
  • महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
  • माविया = 16+10+20+2+1 = 49
  • इतर = 03
  • एकूण = 286

कुणाचे किती खासदार निवडून येऊ शकतात? (Mahavikas Aghadi vs Mahayuti)

  • भाजपकडे  131 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 132 आमदार
  • जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 132/37 = 3.56
  • म्हणजे एकट्या भाजपचे 3 ते 4 खासदार निवडून येऊ शकतात.

शिवसेना शिंदे =  57 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 58 आमदार

  • जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 58/37 = 1.56
  • म्हणजे एकट्या शिंदेसेनेचा 1 खासदार निवडून येऊ शकतो.
  • शिंदेंकडे 20 मते अतिरिक्त असतील.

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 – 1 = 40

  • जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 40/37 = 1.08
  • म्हणजे एकट्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार निवडून येऊ शकतो.
  • राष्ट्रवादीकडे 3 मते अतिरिक्त असतील.

मविआचे किती खासदार निवडून येऊ शकतात? (How many MPs Elected From Mahavikas Ahadi)

  • काँग्रेस- 16 +राष्ट्रवादी (शरद पवार गट)  10 + शिवसेना (ठाकरे गट)- 20 = 46
  • मविआला पाठिंबा देणारे छोटे पक्ष = सपा 2 + माकप  1 = 3
  • मविआकडे 46+3 = 49 आमदारांचं बळ
  • जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 49/37 = 1.32
  • म्हणजे मविआमध्ये सर्व पक्षांचा मिळून 1 खासदार निवडून येऊ शकतो.
  • त्याउलट महायुतीमध्ये भाजपचे 3, शिंदेसेनेचा 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि अतिरिक्त मतांवरुन 1 असे 6 खासदार आरामात निवडून येतील

आणखी वाचा

भाजपकडून नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक, नवनाथ बन यांची बढती, कृष्णराज महाडिकांना मोठी संधी, कोणाला कोणतं पद मिळालं?

पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवत काँग्रेस-ठाकरेंचा हातात हात? राज्यसभेवरून ठाकरेंची दिल्लीशी चर्चा, सूत्रांची माहिती

आणखी वाचा

Comments are closed.