अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका…’, मरिन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये आक्रमक झाल्यानंतर रोह
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघात मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित कंपन्या, अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे आक्रमक झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा अपघाती निधन झालं, याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित केला. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. इतके पुरावे आहेत सगळे न्यूजमध्ये सगळं आलेलं आहे, कारवाई का केली जात नाही, पोलीस ठाण्यामध्ये हे नेते आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर रोहित पवार यांना मरीनड्राईव्ह पोलिसांनी एक पत्र दिल आहे. या पत्रात पोलिसांनी आपण दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून कारयदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे, त्यानंतर आता रोहित पवारांनी आपल्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त करत उद्या सकाळी ९ वाजता FIR दाखल करण्यासाठी अजितदादांवर प्रेम करणारे आम्ही सर्वजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाणार असल्याची माहिती दिली आहे.
Rohit Pawar : पोस्टमध्ये रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलंय?
आमदार रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “अजितदादांच्या विमान अपघाताबाबत योग्य कारवाईची वाट बघत असतानाच काल या अपघातास VSR कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा DGCA चा अहवाल आला. परंतु अद्यापही याबाबत कोणताही FIR दाखल करण्यात आला नसल्याने या अहवालाच्या आधारे आ. अमोल मिटकरी, आ. इद्रिस नाईकवडी आणि आ. संदिप क्षीरसागर यांच्यासह मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन BNS कायद्यानुसार FIR दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार माझा जबाब घेण्यास सुरवातही झाली होती, परंतु त्याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा FIR दाखल करुन घेण्यास नकार देत केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अर्ज घेतला”.
“पोलिसांच्या या कृतीमुळं विमान अपघाताबाबत आम्ही व्यक्त करत असलेला संशय अधिक गडद होत आहे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून मागणी करुनही पोलिसांकडून FIR दाखल करण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. यामुळं सरकार आणि यंत्रणा कुणालातरी वाचवत असल्याचं स्पष्ट दिसत असून हे असंच सुरु राहिलं तर अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका निर्माण होत आहे, परंतु आम्ही मात्र हा विषय तडीस नेल्यावाचून थांबणार नाही. उद्या सकाळी ९ वाजता FIR दाखल करण्यासाठी अजितदादांवर प्रेम करणारे आम्ही सर्वजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाणार आहे”, अशी माहिती देखील रोहित पवारांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टमधून दिली आहे.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत योग्य कारवाईची वाट बघत असतानाच काल या अपघातास VSR कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा DGCA चा अहवाल आला. परंतु अद्यापही याबाबत कोणताही FIR दाखल करण्यात आला नसल्याने या अहवालाच्या आधारे आ. अमोल मिटकरी, आ. इद्रिस नाईकवडी आणि आ. संदिप क्षीरसागर… pic.twitter.com/T1W5sJS9ji
– रोहित पवार (@RRPSpeaks) 25 फेब्रुवारी 2026
Rohit Pawar : बारामतीत जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करू
आम्ही एफआयआर दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलो. यावेळी पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढेही पोलीस स्थानकात होते. यावेळी थोडी वादावादी झाली. यावेळी आमच्या वकिलांनी समजावून सांगितलं. दरम्यान, माझा बयाण टाईप करत असताना मोठे अधिकारी आलेत आणि त्यांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. दुर्दैव आहे जर आम्हाला आमचा अधिक वापरत येत असेल तर आम्ही करायचं काय? सत्तेतील नेते या बाबतीत काय निर्णय घेतात हे हि आम्ही बघू. मात्र उद्या आम्ही बारामतीत जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करू असेही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.