एसटी प्रवासात सवलतीचा लाभ घ्यायचाय, NCMC कार्ड बंधनकारक, कार्डसाठी किती रुपये लागणार?

बीड : एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये पूर्वी आधार कार्ड दाखवले की जेष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि 35 प्रकारच्या विविध लाभार्थ्यांना एसटीच्या तिकिटात सवलत मिळायची. मात्र, आता आधार कार्ड वरील ही सवलत एक मार्च पासून बंद होणार आहे. त्या ऐवजी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य  करण्यात आहे.

राज्यात या कार्डसाठी नोंदणी सुरू असून बीड बस स्थानकात यासाठी प्रवाशांची झुंबड पाहायला मिळतेय. याचा लाभ घेण्यासाठी पहाटेच प्रवासी आगारात रांग लावून आहेत. बीडमध्ये उन्हाचा पारा वाढतोय अशातच मोठ्या संख्येने महिला उन्हात रांगेत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने नियोजन करावे अशी मागणी प्रवाशांची आहे.

NCMC कार्ड कोणत्या सवलतीसाठी आवश्यक

महिला,ज्येष्ठ नागरिक,अमृत ज्येष्ठ नागरिक, दृष्टिहीन,दिव्यांग (शारीरिक अपंग),विद्यार्थी,इतर सर्व सवलती, सवलत नसलेले प्रवासी यांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढावं लागेल. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड जोडून एनसीएमसीसाठी अर्ज करता येईल. दृष्टिहीन,दिव्यांग (शारीरिक अपंग) यांना वैश्विक ओळखपत्र आवश्यक असेल. विद्यार्थ्यांना सरल क्रमांक, इतर सर्व सवलतीसाठी शासकीय प्रमाणपत्र तर सवलत नसलेल्या प्रवाशांना मोबाईल ओटीपी द्यावा लागेल. यानंतर त्यांना एनसीएमसी  कार्ड मिळू शकेल.

NCMC कार्डची वैशिष्ट्ये

सवलतीसाठी RuPay ON-THE-GO (NCMC) स्मार्ट कार्ड आवश्यक आहे.

NCMC कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल.

कार्डची डिलिव्हरी 30 दिवसांत नोंदणीच्या ठिकाणी मिळेल.

सवलत तिकीट फक्त कार्ड वॉलेट मधूनच दिले जाईल.

वॉलेट कॅश किंवा UPI ने टॉप-अप करता येईल.

NCMC कार्डवर आधार कार्ड नुसार नाव व फोटो असतील.

सदर कार्ड रोख समतुल्य व अहस्तांतरणीय आहे.

सवलतीधारी प्रवाशांनी आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे.

हरवलेली किंवा खराब झालेली कार्डे सशुल्क पद्धतीने बदलून देण्यात येतील.

नवीन स्मार्ट कार्ड केवळ ₹199 मध्ये उपलब्ध आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं एनसीएमसी कार्ड काढायचं असल्यास जवळच्या बस डेपो किंवा एजंट यांच्याकडे संपर्क करावा लागेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.