सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या दिवशीच बारामतीत एफआयआरसाठी स्टंट; धन
धनंजय मुंडे रोहित पवारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर नाव न घेता कडाडून टीका केली आहे. दादांना अग्नी द्यायच्या आधी तुम्ही विलिनीकरणाची भाषा बोलत होतात ते काय होते? ज्यावेळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, तेव्हा तुम्हाला वाटले नाही का शुभेच्छा देणारे एक साधे ट्विट करावे? असे म्हणत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.
मुंबईतील वरळी डोम येथील सभागृहात झालेल्या बैठकीत राज्य व देशभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीला प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली.
Dhananjay Munde: महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला काही कळत नाही?
धनंजय मुंडे म्हणाले की, दादांच्या अकाली निधनानंतर सर्वांनी निर्णय घेतला की, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचे. माझी मध्यंतरी वाचा गेली होती. तशीच गेली असती तर बरे झाले असते, असं म्हणण्याची वेळ माझ्यावर आली आहे. कारण आपल्या मुखातून दादांबद्दल शोक व्यक्त करण्याची वेळ आली नसती. महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुनेत्रा ताई व्यवस्थित सांभाळातील, असा आम्हाला विश्वास आहे. वहिणींना शपथविधीची घाई झाली होती, आम्ही दबाव टाकत होतो असे म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे. अजित दादांना अग्नी द्यायच्या आधी तुम्ही विलिनीकरणाची भाषा बोलत होतात ते काय होते? ज्यावेळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हा तुम्हाला वाटले नाही का शुभेच्छा देणारे एक साधे ट्विट करावे? महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला काही कळत नाही? असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
Dhananjay Munde on Rohit Pawar: माझ्या सारख्याला हे खूप किळसवाणे वाटते
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, आज सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करणार हे आम्ही आधीच जाहीर केले होते. काल एफआयआर घेतला नाही म्हणून स्टंट केला. आज बारामतीला एफआयआरसाठी स्टंट केला. हे सगळे आमच्या न्यूज किलिंगसाठी केले जात आहे. माझ्या सारख्याला हे खूप किळसवाणे वाटते, असे म्हणत त्यांनी रोहित पवारांवर टीका केली.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.