नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्यावरून समज का देत नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पक्षाने मला आपल
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची वारंवारं येणारी वादग्रस्त वक्तव्य आणि काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की, ‘सर्व मदरसे बंद करू, तोडून टाकू; लोकांनी तिथे जाऊ नये, तिथे दहशतवादी तयार होतात.’ अशा प्रकारची सर्वांना एकाच चौकटीत बसवणारी विधाने करून सतत वातावरण पेटवत ठेवण्याचा प्रयत्न होतो. हिंदूच्या मुद्द्यावरही तुम्ही ‘आम्ही हिंदू-हिंदू करत नाही’ असे म्हणता; पण सोयीचे वाटले की तो मुद्दा पुढे करता. नितेश राणे यांच्यासारख्यांना तुम्ही मोकळे सोडले आहे. त्यांना आवर का घालत नाही. ‘करा जितकी घाण करायची आहे, करा जितका गोंधळ घालायचा आहे,’ अशी भूमिका घेतली जाते. पण याचा शेवटी काय फायदा होतो, या प्रश्नावरती उत्तर देताना वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांचे देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले.(Devendra Fadnavis On Nitesh Rane)
पक्षाने मला आपला सर्वोच्च नेता म्हणून निवडले आहे
तर या प्रश्नावरती उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “भारतीय जनता पक्षाची नीती तीच असते जी मी सांगतो; कारण पक्षाने मला आपला सर्वोच्च नेता म्हणून निवडले आहे. त्यामुळे मी जे बोलतो, तीच भाजपची अधिकृत भूमिका असते. इतर कोणी काही बोलले, तर ते त्यांचे वैयक्तिक मत असते. नितेश राणे यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, कधी कधी बोलताना ते काही गोष्टी जास्त बोलून जातात. अशा वेळी मी त्यांना सांगतो की, ‘तुमचे हे विधान योग्य नाही, असे बोलणे टाळायला हवे.’ मात्र मदरशांबाबत त्यांनी जे विधान केले, ते त्या काळातील परिस्थितीच्या संदर्भात होते. त्या वेळी काही ठिकाणी बाहेरून निधी येत असल्याची माहिती होती आणि काही गोष्टी शिकवल्या जात असल्याबाबत आक्षेप होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ते वक्तव्य केले होते. त्यामुळे त्या विधानाकडे एकट्या घटनेप्रमाणे न पाहता, संपूर्ण परिस्थितीच्या संदर्भात पाहणे आवश्यक आहे.”
काय म्हणाले होते नितेश राणे?
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी 25 फेब्रुवारी रोजी पत्रकारांशी बोलताना मालेगावमधील नमाज पठणाच्या वादावर भाष्य केलं. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील मदशांबाबत देखील मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य केलं. ते महाराष्ट्रातील मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडे सगळे मदरसे बंद करण्याची मागणी करणार आहे असं देखील म्हणाले. दरम्यान, मालेगावमधील नमाज प्रकरणी देखील नितेश राणे यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी निवडणुकीआधी हे लोक जय भीम जय भीम करतात मात्र निवडून आल्यावर बाबासाहेबांना विसरतात. संविधानात नमाज पठणाला कुठं मान्यता आहे. नमाज पठणाला मशिदी काय बंद होत्या का? ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही देखील गीता वाचायला सुरूवात करणार मग या हिरव्या सापांनी बोलू नये असं वादग्रस्त विधान देखील त्यांनी केलं. त्यांनी मदरशांबाबत वक्तव्य करताना मदरसे हवेतच कशाला, मदरसे दहशतवादी चालवतात. आम्ही शाळांमध्ये भगवत गीता शिकवू मदरशांचे लाड कशाला करायचे असा सवाल देखील विचारला. यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत सगळे मदरसे बंद करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं देखील ते म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.