भंडारा लावून बोलतोय, धनंजय मुंडेंच्या केसाला पण धक्का लागला तर… जरांगेंसह सुरेश धसांना इशारा
बीड वार्ता: विविध घटनामुळं सध्या बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण गरम असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील कलगीतुरा सर्वांनाच माहित आहे. अशातच माजी मंत्री आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असणारे गोविंद फड यांची फेसबुक वरील पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास.. जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय, अशी पोस्ट गोविंद फड फेसबुकवर पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गोविंद फड यांनी केलेल्या पोस्टमुळं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गोविंद फड हे परळी बाजार समितीचे माजी सभापती
आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांची फेसबुक वरील पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास.. जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय अशी पोस्ट फड यांनी केली आहे. इंग्रजी भाषेमध्ये ही पोस्ट टाकण्यात आली आहे. नेमकी अशी पोस्ट का केली? यासंदर्भात माहिती भेटू शकली नाही.
गोविंद फड यांच्या पोस्टने मोठी खळबळ
बीड जिल्ह्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, महादेव मुंडे हत्या प्रकरण, मराठा आरक्षणाचा मुद्दा असो अशा विविध मुद्यावरुन राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तसेच विविध आंदोलनांदरम्यान नेतेमंडळींवर टीका होत असताना गोविंद फड यांच्या पोस्टने मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर समर्थक आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. गोविंद फड यांनी फेसबुक पोस्टमध्ये थेट नावे घेत जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना उद्देशून भाष्य केल्याने हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे. काही जणांनी या पोस्टला खुले आव्हान म्हणून पाहिले असून, राजकीय दबावाखाली अशी भाषा वापरणे चुकीचे असल्याची टीका केली जात आहे. तर दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून फड यांच्या भूमिकेचे समर्थन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
चित्रपटातील व्हिलन लक्षात राहतो, हिरो मात्र लक्षात राहत नाही, नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
आणखी वाचा
Comments are closed.