इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ

सोन्याची किंमत इस्रायल विरुद्ध इराण युद्ध: संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव आता अधिक तीव्र झाला आहे. अशातच या संघर्षाचा विस्तार झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण मध्यपूर्वेत जाणवू शकतात. इराणने (Israel Vs Iran War) प्रत्युत्तरादाखल काही देशांमधील अमेरिकेंच्या बेसवरती हल्ले केल्याचे वृत्त समोर आले असून परिस्थिती अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. याचा थेट परिणाम भारतावरही पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Israel Vs Iran War) दुसरीकडेअमेरिका आणि इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासातच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today)  मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यानगेल्या काही महिन्यापासून रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी वाढ झाल्यानंतर त्यात मागील महिन्यात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळाले होते. मात्र, काल अमेरिका आणि इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या नंतर गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या खरेदीकडे वळल्याने सोन्याच्या आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात अकरा हजार रुपयांची वाढ, तर चांदीचे दर 3 दशलक्ष 3 हजारांवर

अशातच वाढती मागणी आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने सोन्या चांदीची खरेदी होऊन केली जात असताना सोन्याच्या दरात अकरा हजार रुपयांनी वाढून ते 1, 75, 500 पोहचले आहे. तर चांदीचे दर पंचवीस हजार रुपयांची वाढ होऊन ते 3 दशलक्ष 3 हजारांवर जाऊन पोहोचले आहेत, ही वाढ युद्धाची ठिणगी पडताच अवघ्या काही तासातच झाल्याचं पाहायला मिळत आहे. युद्धजन्य परिस्थिती लांबल्यास अजूनही सोन्याचे आणि चांदीचे (Gold Silver Price Today) वाढू शकतात, असा अंदाज सुवर्ण व्यावसिकांni व्यक्त केला आहे.

दरम्यानअचानक रित्या सोन्याच्या आणि चांदीच्या (Gold Silver Price) दरात झालेल्या दरवाढीने सर्व सामान्य ग्राहकांच्या बजेटमधे बिघाड झाल्याचं चित्र आहे. तर ग्राहकांनी नाराजीहे व्यक्त केली असून सरकारने सोने चांदीचे दर स्थिर राहतील यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आज सोन्याचा भाव किती आहे? (Gold Price Today)

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 17, 323 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 15,880 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 12,996 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मुंबईहैदराबाद, केरळ आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 17, 308 रुपये आहे. त्याचप्रमाणे 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 15,865 रुपये आणि 12,981 रुपये प्रति ग्रॅम आहे.

चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 17,209 रुपये आहे. येथे 22 कॅरेट सोन्याचा भाव 15,775 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 13,500 रुपये आहे.

याचा अर्थ असा की शनिवारच्या तुलनेत रविवारी सोने महाग झाले. एका दिवसात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ४,३७० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४,०२० रुपयांनी वाढले आहेत. दरम्यान, १८ कॅरेट सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात ३,२८० रुपयांची वाढ झाली आहे.

Israel Vs Iran War : इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

दरम्यान, खामेनी यांच्या सोबत कुटुंबातील आणखी चार सदस्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी माध्यमांनीही या बातमीची पुष्टी केल्याचे सांगितले जाते. ‘प्रेस टीव्ही’ने खामेनी आता हयात नसल्याचे वृत्त दिले आहे. त्यांच्या निधनानंतर 40 दिवसांच्या राष्ट्रीय शोकाची घोषणाही करण्यात आली आहे.  मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती कायम आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने अनेक अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, रविवारी (1 मार्च 2026) खामेनी यांच्यासह त्यांच्या मुलगी, जावई आणि नात यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.