नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं, कोण आहेत मायाताई इवनाते?
राज्यसभा निवडणूक 2026 भाजप महाराष्ट्र उमेदवार: भाजपच्या गोटातून एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात प्रमुख्याने रामदास आठवले, विनोद तावडेंसह रामदास वडकुते यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (BJP Maharashtra Rajya Sabha Election Candidate 2026) अशातच भाजपनं नव्या चेहरायांना देखील संधी दिल्याचं दिसून आलं आहे. यात नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते यांनाहे भाजपनं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. विशिष्ट म्हणजे नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आलं आहे. दरम्यान परिचारिका मायाताई इवनाते कोण आहेत? हे आपण जाणून घेऊया.
राज्यसभा निवडणूक 2026 : मायताई इवनाते भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवार; पक्षाकडून अधिकृत घोषणा
-पूर्ण नाव – मायाताई चिंतामण इवनाते
-नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत. १५ डिसेंबर २००७ ते २३ डिसेंबर २००९ पर्यंत नागपूर महानगरपालिका मध्ये महापौर पद भूषवले..
-अनेक वर्षांपासून नागपूर शहर भाजप मध्ये सक्रिय आहे.
-शहर, प्रदेश भाजप मध्ये विविध पदावर कार्य करण्याचा अनुभव आहे.
– आदिवासी समाजातून येतात.
-राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग ( NCST) च्या सदस्य पदी राहिलेल्या आहेत.
-2026 निवडणुकीत नागपूर महानगरपालिका मध्ये प्रभाग 12 मधून भाजपच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यापूर्वी सुद्धा अनेक वर्ष नागपूर महानगरपालिका मध्ये नगरसेवक राहिलेल्या आहेत.
मायाताई ईवनाते भाजपचा आदिवासी चेहरा (Who is Mayatai Ivnate)
2002 – नगरसेवक भाजप
2007 – महापौर, नागपूर
2012 – नगरसेवक, ( भाजप प्रदेश उपाध्यक्ष)
2017 – राष्ट्रीय आदिवासी आयोग सदस्य
2026 – नगरसेवक आणि अग्निशमक सभापती मनपा नागपूर
महाराष्ट्रमहाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य)
- शरद पवार (श.प. गट)
- रामदास आठवले (रिपाई)
- फौजिया खान (श.प. गट)
- रजनी पाटील (काँग्रेस)
- प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
- धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
- भागवत कराड (भाजप)
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
- 5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
- 6 मार्च – अर्जांची छाननी
- 9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
- 16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी
संबंधित बातमी:
Rajya Sabha Election 2026: भाजपचे 3 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
आणखी वाचा
Comments are closed.