राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणा
राज्यसभा निवडणूक 2026: राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान (Rajya Sabha Election 2026) होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. दरम्यान, काल भाजपकडून 4 नावं जाहीर करण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अजित पवार गटाकडून पार्थ पवार (Parth Pawar) यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून अद्यापही नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यानंतर आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
शरद पवारांविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवारांसमोर एकनाथ शिंदे (मराठी) यांचे मोठे आव्हान असणार आहे. एकनाथ शिंदे शरद पवारांना पराभूत करण्याची योजना आखत आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांची आवश्यकता आहे. महायुतीला एकूण 232 आमदारांचा पाठिंबा आहे. शिंदे गटाकडे 20 अतिरिक्त मते आहेत, तर अजित पवारांच्या गटाकडे 3 अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आज नेमके किती उमेदवार जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Rajya Sabha Election 2026)
राज्यसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून कोणकोण इच्छुक, संपूर्ण यादी- (Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate)
- राहुल शेवाळे
- शायना एनसी
- ज्योती वाघमारे
- संजय निरुपम
- गजानन किर्तीकर
- आनंदराव अडसूळ
- हेमंत गोडसे
- संजय मंडलिक
भाजपकडून राज्यसभेसाठी 4 नावं जाहीर- (Rajya Sabha Election 2026 BJP Maharashtra Candidate List)
भाजपकडून रामदास आठवले (Ramdas Athawale), विनोद तावडे (Vinod Tawde), माया चिंतामण ईवनाते (Maya Ivnate ) आणि रामराव वडकुते (Ramrao Wadkute) यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात. त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
महाराष्ट्रमहाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य)
- शरद पवार (श.प. गट)
- रामदास आठवले (रिपाई)
- फौजिया खान (श.प. गट)
- रजनी पाटील (काँग्रेस)
- प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
- धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
- भागवत कराड (भाजप)
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
- 5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
- 6 मार्च – अर्जांची छाननी
- 9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
- 16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी
कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित? (Rajyasabha Election 2026)
राज्यसभेच्या एकूण जागा : 7
- विद्यमान विधानसभा सदस्य : 286 (अजित पवार आणि शिवाजी कर्डिले या दोन जागा रिक्त)
- कोटा : 3576 (म्हणजे 3600 मते) ( येथे एका आमदाराचे मत म्हणजे 100, म्हणून 36 आमदार हा कोटा)
- (फॉर्म्युला : 286 गुणिला 100/भागिला 7 जागा+1/अधिक+1)
- (अर्थात एकूण झालेल्या मतदानावरुन कोटा निश्चित होतो)
भाजपा : 136 (कर्डिले 1 वगळता)
- तीन जागांसाठी लागणार : 108
- भाजपाकडे अतिरिक्त मते : 28
शिवसेना : 56
- एक जागेसाठी लागणार : 36
- अतिरिक्त मते : 20
राष्ट्रवादी : 40 (अजित पवार वगळता)
- एक जागेसाठी लागणार : 36
- अतिरिक्त मते : 4
महायुती : 52 अतिरिक्त मते
सहाव्या जागेची 36 मते वजा केली तरी 16 मते अतिरिक्त…म्हणजे सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मते अतिरिक्त आणावी लागतील.
उबाथा: २०
- एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 16
शरद पवार : १०
- एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 26
काँग्रेस : 16
- एका जागेसाठी अतिरिक्त मते लागतील : 20
(त्यामुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल तर दोन शक्यता: तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देणे, किंवा काँग्रेस आणि उबाठा हे दोनच पक्ष एकत्र आले तरी 36 असे काठावरचे बहुमत त्यांना लाभते)
संबंधित बातमी:
Rajya Sabha Election 2026: भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
आणखी वाचा
Comments are closed.