महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, एकनाथ शिंदेंच्या सेनेकडून पवार
राज्यसभा निवडणूक 2026: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2026) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या विरोधात रोहित टिळक (Rohit Tilak) यांना रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत थेट पवार विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत.
Rajya Sabha Election 2026: महाविकास आघाडीची शक्तीप्रदर्शनासह एंट्री
शरद पवार यांच्या उमेदवारी अर्जावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. सुप्रिया सुळेंसोबतच संजय राऊत, जयंत पाटील, भास्कर जाधव, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, आदित्य ठाकरे हे अर्ज दाखल करताना गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Rajya Sabha Election 2026: शिंदे गटाचे दोन उमेदवार
शिवसेनेच्या वाट्याला एक जागा असली तरी शिंदे गटाने दोन उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे समोर आले आहे. सोलापूर येथील पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि रोहित टिळक, जे पुण्यातील काँग्रेसशी संबंधित असून लोकमान्य टिळकांचे पणतू आहेत. या दोघांनाही उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ते विधानभवनात दाखल होणार आहेत.
Rajya Sabha Election 2026: राज्यसभेचं गणित आणि वाढलेली उत्सुकता
शिंदे गटाला दुसरी जागा जिंकण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज आहे. त्यामुळे सातव्या जागेसाठीची लढत अधिक रंगतदार ठरणार आहे. शरद पवार यांच्याविरोधात रोहित टिळक यांची उमेदवारी देऊन शिंदे गटाने मोठा राजकीय डाव टाकल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या 37 जागांसाठी देशभरात निवडणूक प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रातील ही लढत विशेष लक्षवेधी ठरत आहे. पुढील काही दिवसांत अंकगणित आणि राजकीय रणनीती यांचा कस लागणार आहे.
महाराष्ट्रमहाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य)
शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई)
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
6 मार्च – अर्जांची छाननी
9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी
कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित? (Rajyasabha Election 2026)
राज्यसभेच्या एकूण जागा : 7
कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित? (Rajyasabha Election 2026)
राज्यसभेच्या एकूण जागा : 7
- विद्यमान विधानसभा सदस्य : 286 (अजित पवार आणि शिवाजी कर्डिले या दोन जागा रिक्त)
- कोटा : 3576 (म्हणजे 3600 मते) ( येथे एका आमदाराचे मत म्हणजे 100, म्हणून 36 आमदार हा कोटा)
- (फॉर्म्युला : 286 गुणिला 100/भागिला 7 जागा+1/अधिक+1)
- (अर्थात एकूण झालेल्या मतदानावरुन कोटा निश्चित होतो)
भाजपा : 136 (कर्डिले 1 वगळता)
- तीन जागांसाठी लागणार : 108
- भाजपाकडे अतिरिक्त मते : 28
शिवसेना : 56
- एक जागेसाठी लागणार : 36
- अतिरिक्त मते : 20
राष्ट्रवादी : 40 (अजित पवार वगळता)
- एक जागेसाठी लागणार : 36
- अतिरिक्त मते : 4
महायुती : 52 अतिरिक्त मते
सहाव्या जागेची 36 मते वजा केली तरी 16 मते अतिरिक्त…म्हणजे सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मते अतिरिक्त आणावी लागतील.
उबाथा: २०
- एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 16
शरद पवार : १०
- एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 26
काँग्रेस : 16
- एका जागेसाठी अतिरिक्त मते लागतील : 20
(त्यामुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल तर दोन शक्यता: तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देणे, किंवा काँग्रेस आणि उबाठा हे दोनच पक्ष एकत्र आले तरी 36 असे काठावरचे बहुमत त्यांना लाभते)
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.