व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन, पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या, अमोल मि
मुंबई: आजही आदरणीय दादांच्या (Ajit Pawar Plane Crash) विमान दुर्घटनेबाबत सभागृहाच्या कामकाजात चर्चा नाही.अर्धे अधिवेशन संपले पण दादांच्या विमानाचा अपघात की घातपात (Ajit Pawar Plane Crash) ही चर्चा महाराष्ट्राच्या सभागृहात न होणे ही बाब वेदनादायी व तितकीच चिंताजनक आहे. नेमकं पाणी कुठं मुरतंय तेच कळेना. राजकारण खरंच वंगाळ असतं हे दादांचे शब्द खरे ठरलेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबात पोस्ट देखील लिहली आहे, तसेच एबीपी माझाशी बोलताना अमोल मिटकरींनी म्हटलं की, सर्वांना हे वाटतं आहे की अजित दादांच्या विमानाचा घातपात आहे की अपघात आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे, पण हे नुसतं वाटून चालत नाही, सभागृहामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन, किंवा अल्पकालीन चर्चा आहे, या चर्चेच्या माध्यमातून ती चर्चा घडवून आणल्यानंतर मग ते रेकॉर्डवर येणार की आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित दादांचा विमान अपघातानंतर (Ajit Pawar Plane Crash) पहिल्याच अधिवेशनामध्ये चर्चा होत नाही अशी खंत अमोल मिटकरींनी व्यक्त केली आहे. (Ajit Pawar Plane Crash)
मुख्यमंत्री यांना भेटून माळी कुटुंबियांच्या संरक्षणाबाबत बोलणार
मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आजच्या कामकाजात अजित पवार यांच्या अपघाती निधनाची चर्चा येईल असे सांगितले. मात्र आजच्या कामकाजात चर्चा नाही. ही फार गंभीर बाब आहे. व्ही.के.सिंग याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली, तो काल मॅच बघायला होता. माळी कुटुंबियांना त्यांच्याकडून धमक्या येत होत्या. मी मुख्यमंत्री यांना भेटून माळी कुटुंबियांच्या संरक्षणाबाबत बोलणार आहे. व्ही.के.सिंग यांचे अंडरवल्डशी संबंध आहे असा संशय आहे, असंही मिटकरींनी म्हटलं आहे.(Ajit Pawar Plane Crash)
प्रश्न विचारणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे
पुढे ते म्हणाले की, जेव्हा अधिवेशन संपल्यानंतर मतदार संघात गेल्यानंतर जनता आम्हाला विचारेल आणि हे वास्तव आहे, आपण किती वेळ काढला तरी जनता याबाबत विचारणारच आहे, नेमकं काय, तुम्ही का नाही बोलला, उद्या मुलं विचारतील, सुना विचारतील, नातवंड विचारतील, आज तारीख दिली होती, आज वरच्या सभागृहामध्ये चर्चा होईल असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं, पण आजच्या कामकाजात चर्चा नाही, त्यामुळे माझ्या दोन शंका आहेत, एक तर ठोस उत्तर सरकारकडे नाही, कारण विरोधी पक्ष कोणताही प्रश्न विचारू शकतो, आणि दुसरं म्हणजे चर्चाच घडवून आणायची नाही, मी स्पष्ट सांगतो आहे, मी सत्ताधारी आहे तर काय करणार, यामध्ये माझा दोष आहे का, रोज अपघाताची चर्चा चर्चेला येते, सत्ताधारी पक्षात असलो तरी अजित दादांमुळे मी सत्तेत आहे, आणि त्या माणसासोबत असं झालं असेल तर प्रश्न विचारणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे, यामध्ये दोन गोष्टीच दिसत आहेत, मी पुन्हा सांगतोय की, माननीय गृहमंत्र्यांना उत्तर द्यावं लागतंय आणि, आणि कुठल्याही प्रश्नाचे उत्तर चुकीचं जाऊन नवीन वाद महाराष्ट्रात होऊ नये त्यामुळे पूर्ण प्रश्नांची उत्तर आल्याशिवाय आपण उत्तर द्यायचं नाही आणि म्हणून ती चर्चा थांबवली असावी, किंवा चर्चा होऊ नये यासाठीच हे सगळं चालू असावं, अशी शक्यताही अमोल मिटकरींनी बोलून दाखवली आहे.
तर आमदार हिरामण खोसकर यांनी म्हटलं की, आता अधिवेशन सुरू आहे आम्हाला अधिवेशन झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते लोक विचारतील की तुम्ही अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा का उचलला नाही? जो मी आज काही आहे आणि निवडून आलो आहे तो अजित पवारांमुळे आलो आहे आणि त्यांच्या अपघाताबद्दल तर चर्चा व्हायलाच हवी ही आमची विनंती आहे. कारण आम्हाला लोकांना उत्तर द्यावं लागेल. आम्हाला लोक विचारतील की तुम्ही सभागृहात जाऊन काय करता? असंही खोसकरांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.