गॅसचा भडका, सोन्याचे दर जैसे थे; चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा, पाहा लेटेस्ट दर

महाराष्ट्रात आज सोन्या-चांदीचा भाव पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची झळ महाराष्ट्रातही बसत आहे. गॅसचे दर गगनाला भिडले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे अनेक रेस्टॉरंटला टाळं लावण्याची वेळ आली आहे. तसेच सोनं आणि चांदीच्या दराचा आलेख कायम चढताच राहत आहे.  गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याच्या दराने भाव खाल्ला आहे. राज्यातील सुवर्णनगरी अर्थात जळगावात सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे भाव जैसे थे आहे.  तर,   चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे.  ग्राहक सोन्याच्या दरात घसरण होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.  दरम्यान,  आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, अशी नोंद आहे. तर, चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

आज 11 मार्च 2026 रोजी सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे भाव जैसे थे आहे. 1 तोळं सोन्याचे दर 1,60,500 रुपये इतका आहे.  काल सोन्याच्या दरात वाढ झाली होती. 10 मार्च 2026 रोजी सोन्याचे दर इतकेच होते. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर, 10 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 16,05,000 रुपये मोजावे लागतील.  त्यामुळे सामान्यांच्या मनात सोनं खरेदी करावे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, चांदीच्या दरात घसरण झाली आहे.   1 किलो चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला 2,73,000 रुपये मोजावे लागतील. लग्न सोहळा किंवा सणांसाठी तुम्ही चांदीचे दागिने करु इच्छित असाल तर, आजच चांदी खरेदी करा.

मुंबईत सोन्याचे दर किती?

आज 11 मार्च 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात  930 रुपयांची वाढ झाली आहे.  1 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,63,310 रुपये मोजावे लागतील. तर, 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या दरात 9,300 रुपयांची वाढ झाली आहे. 10 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 16,33,100 रुपये मोजावे लागतील.

तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे.  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात  850 रुपयांची वाढ झाली आहे.  1 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,49,700 रुपये मोजावे लागतील. तर, 22 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या दरात 8,500 रुपयांची वाढ झाली आहे. 10 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 14,97,000 रुपये मोजावे लागतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!

आणखी वाचा

Comments are closed.