सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश,

अजित पवार स्मारक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावे संस्था, ट्रस्ट, फाउंडेशन नोंदणी किंवा सार्वजनिक ठिकाणी पुतळे व स्मारके उभारण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करावे, असे प्रसिद्धीपत्रक धर्मादाय आयुक्त कार्यालय वरळी मुंबई यांनी नुकतेच प्रसिद्ध केलेले आहे. (Maharashtra Politics news)

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या कार्यालयाकडून विशेष कार्यअधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला पत्र लिहून दिवंगत अजित दादांच्या नावाने कोणतीही नवीन संस्था, ट्रस्ट किंवा फाउंडेशन नोंदणी करताना कुटुंबीयांची लेखी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांचे पुतळे किंवा स्मारके उभारण्याबाबत सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, जागेच्या मालकी हक्काचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याच पत्रात नमूद केले होते. अजित पवार यांच्या नावाचा वापर करून अनधिकृत निधी गोळा करणाऱ्या किंवा संशयास्पद कामकाज करणाऱ्या संस्थांची सखोल चौकशी करावी. आधीपासून अस्तित्वात असलेल्या संस्थांनी नाव बदलून स्व. अजित दादा पवार यांचे नाव लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाही हेच नियम लागू करावेत, असे पत्रकाच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त कार्यालयाला कळवले होते त्यानुसार आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पत्रक प्रसिद्ध करत नियम व अटी लागू केल्या आहेत.

अजित पवार यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे असून जनमानसात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अनेक जण संस्था, ट्रस्ट किंवा स्मारके उभारण्याचा विचार करत आहेत. त्यांच्या नावाचा चुकीचा किंवा व्यावसायिक वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित दादांच्या नावाने कोणतीही नवीन संस्था, ट्रस्ट किंवा फाउंडेशन नोंदणी करताना कुटुंबीयांची लेखी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांचे पुतळे किंवा स्मारके उभारण्याबाबत सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

आणखी वाचा

अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी

आणखी वाचा

Comments are closed.