11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल

मुंबई : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. एकीकडे हे चित्र असलं तरी दुसरीकडे भारतीय शेअर बाजारातील काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी 11 रुपयांवर असलेला स्टॉक आता 1205 रुपयांवर पोहोचला आहे. या स्टॉकनं गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी या कंपनीचा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे. गेल्या काही वर्षात कंपनीचा स्टॉक मजबूत झाला आहे. दीर्घकालीन विचार केला असता लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. मार्च 2021 मध्ये हा स्टॉक 11 रुपयांवर होता. सध्या हा स्टॉक 1205 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच या कंपनीच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना 10854 टक्के परतावा दिला आहे.

आकडेवारीचा विचार केला असता मार्च  2021 मध्ये ज्या गुंतवणूकदारानं या कंपनीचे  1 लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असतील त्याचं मूल्य आता 1 कोटींच्या पुढं गेलं असेल.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये 2021 नंतर तेजी पाहायला मिळाली आहे. मे 2024 ते जुलै 2025 मध्ये या शेअरमध्ये जोरदार तेजी होती. या काळात स्टॉकनं 120 टक्के परतावा दिला होता. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या शेअरनं  1643.40 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

महाराष्ट्रातील प्रमुख लोखंड आणि मायनिंग कंपनी असलेल्या या कंपनीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांची देखील चांगली भागिदारी आहे. आकडेवारीनुसार या कंपनीत 32.5 टक्के भागिदारी रिटेल गुंतवणूकदारांकडे आहे.म्हणजेच या स्टॉकमधील तेजीचा फायदा छोट्या गुंतवणूकदारांना देखील मिळाला आहे.

भारतीय शेअर बाजारात बीएसईवर हा स्टॉक 12 मार्चला 19.45 रुपयांच्या तेजीसह 1205.60 रुपयांवर होता. आज म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजारात  या स्टॉकमध्ये घसरण झाली आहे. 58 रुपयांच्या घसरणीसह शेअर 1147.60 रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा

Comments are closed.