फरार कुख्यात गुंड हर्षद पाटणकरचं नाशिक पोलिसांना थेट आव्हान, मित्रावर प्राणघातक हल्ला चढवत वाहन

नाशिक क्राईम न्यूज : साडेनऊ महिन्यांपासून नाशिक पोलिसांना (Nashik Police) चकवा देणारा कुख्यात गुंड हर्षद पाटणकर (Harshad Patankar) पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. पंचवटी (Panchavati) परिसरातील मोरे मळा (हनुमानवाडी) येथे रविवारी (दि. 15) रात्री त्याने आपल्या साथीदारांसह एका जुन्या वादातून मित्रावरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे नाशिकमध्ये पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. (Nashik Crime News)

गंगापूर परिसरातील जाधव-पवार आणि पाटणकर टोळ्यांमध्ये वर्चस्वाच्या वादातून गेल्या काही महिन्यांपासून तणाव निर्माण झाला होता. याच वादातून रविवारी रात्री ठिणगी पडली. फिर्यादी निलेश रणमाळे हा आपल्या मित्रांसोबत हनुमान मंदिराजवळ गप्पा मारत असताना दबा धरून बसलेल्या हर्षद पाटणकर आणि त्याच्या साथीदारांनी त्याला घेरले.

Nashik Crime News: ‘शूट’चा इरादा, पण दगड-शस्त्रांनी हल्ला

रणमाळेला ठार मारण्याच्या उद्देशानेच टोळी तेथे जमली होती, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र प्रत्यक्ष हल्ल्यावेळी आरोपींनी दगडफेक आणि धारदार शस्त्रांचा वापर करत रणमाळेवर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून परिसरातील काही वाहनांचेही नुकसान झाले आहे.

Nashik Crime News: ‘फायरिंग’ची उडाली अफवा

हल्ल्यादरम्यान कारच्या काचा फोडण्यात आल्या. काचा फुटताना निर्माण झालेल्या मोठ्या आवाजामुळे परिसरात गोळीबार झाल्याची अफवा पसरली. मात्र पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील आणि सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाठ यांनी घटनास्थळी पाहणी करून गोळीबाराचा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले.

Nashik Crime News: पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

हर्षद पाटणकर हा अनेक महिन्यांपासून फरार असतानाही शहरात गुन्हे करत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला कडक आदेश दिले आहेत. “गरज पडल्यास जलद प्रतिसाद पथकाची मदत घ्या, पण हर्षद पाटणकरला तातडीने अटक करा,” अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Who is Harshad Patankar: पाटणकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी

हर्षद पाटणकरविरुद्ध खूनाचा प्रयत्न, जबर दुखापत, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा 9 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो यापूर्वी तडीपारही झाला होता. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने शहरात मिरवणूक काढल्याची घटनाही चर्चेत होती. जुलै 2024 मध्ये सुटका झाल्यानंतर तो पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला. तसेच, कामटवाडा परिसरातील एका अल्पवयीन मुलाच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जानेवारी 2026 मध्ये लेखानगरात कारची तोडफोड आणि गोळीबाराच्या दाव्याप्रकरणीही त्याच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा

Nashik Crime News: डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट, घरात आढळल्या दोन वापरलेल्या सिरिंज अन् एक चाकू; पती निलेश जेजुरकर अजूनही फरार

आणखी वाचा

Comments are closed.