बदला!! वडिलांचा मारेकरी 9 महिन्यांनी जामीनावर सुटला, गावातच गाठून बदला घेतला, महाराष्ट्र हादरला

गोंदिया क्राईम न्यूज : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. 9 महिन्यांनी वडिलांच्या मारेकऱ्याचा बदला घेतल्याची घटना घडली आहे. वडिलांचा मारेकरी जामीनावर सुटून बाहेर आला होता, यावेळी गावातच गाठून मुलाने त्याचा बदला घेतला आहे. या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा इथं ही घटना घडली आहे.

गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी येथे जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची तलवारीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. भुरु उर्फ देवेंद्र ताराम (25) असे हत्या करण्यात आलेले तरुणाचे नाव आहे.  9 महिन्यांपूर्वी मृतक देवेंद्र याने आरोपी सुनील कांबळे याचे वडील आसाराम कांबळे याची जादूटोणाच्या संशयातून हत्या केली होती. 8 दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून सुटल्यानंतर मृतक देवेंद्र हा आपल्या गावी परतला होता. मृतक देवेंद्र गावात परत आल्याचे कळताच आरोपी सुनील याने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचे चंग बांधला होता. त्याने संधी साधून मृतक देवेंद्रला गावातच पकडले व तलवारीने सपासप वार केले. मान, हात, पाय आणि पोटाला झालेल्या गंभीर जखमांमुळं देवेंद्रचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी सुनील कांबळे याने  पोलीस पाटलांसमोर  समर्पण केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या:

मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक

आणखी वाचा

Comments are closed.