संभाजीनगरात मोठा ट्विस्ट, ठाकरेसेना तटस्थ राहणार, शिंदेसेनेला धक्का, भाजपला अप्रत्यक्ष मदत!
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद बातम्या: राज्यातील 5 जिल्हापरिषदांमध्ये आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. सोलापूरसंभाजीनगर, परभणी, सांगली आणि सातारा या जिल्हा परिषदांमध्ये आज (18 मार्च) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad News)
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad) ठाकरे गटाच्या सदस्यांनी कुणालाही मतदान करू नये, तटस्थ राहावे, असं व्हीप शिवसेना ठाकरे गटाकडून काढण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून तटस्थ राहण्याच्या सूचना दिल्यामुळे याचा थेट भाजपला फायदा होणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाला याचा फटका बसेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेची चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी काढलेल्या व्हीपमध्ये काय? (शिवेना UBT छत्रपती संभाजीनगर)
दिनांक 18 मार्च 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या होणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवारास मतदान करु नये.
आपला नम्र,
अंबादास दानवे (जिल्हाप्रमुख-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
ठाकरेंचे दोन सदस्य गायब- (Shivena UBT Chhatrapati Sambhajinagar)
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन सदस्य गायब असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही सदस्य भाजपच्या गोटात गेल्याचं सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आणि ललिता सोनवणे भाजपच्या गोटात गेल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील एकूण सदस्य संख्या- 63
अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून येण्यासाठी लागणारे संख्याबळ- 32
भाजप- 23
एकनाथ शिंदे सैन्य – 21
उद्धव सेना- ९
राष्ट्रवादी अजित पवार- 4
काँगेस- 1(त्यांनी भाजप प्रवेश केला आहे)
राष्ट्रवादी शरद पवार- १
अपक्ष- 4
भाजपची मॅजिक फिगर-
भाजप 23 + राष्ट्रवादी अजित पवार4+ काँग्रेस 1 भाजप प्रवेश केलेला+ अपक्ष 3 उद्धव ठाकरे यांचे 2 सदस्य- 33 संख्याबळ
छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.