लोणावळ्यातील आलिशान व्हिलामध्ये चालत होता करोडोंचा सायबर घोटाळा;चीन कनेक्शनने पोलिसही चक्रावले!

गुन्हा करा: पुण्याच्या लोणावळ्यात चीन कनेक्शन असलेल्या सायबर फसवणूक प्रकरणाचा मोठा पर्दाफाश झाला आहे. ही टोळी हाँगकाँगमधील कंपनीत नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवत होती. लोणावळ्यातील एका व्हिलातून तरुणांची फसवणूक सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचत चार आरोपींना अटक केली आहे. (Pune Crime)

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोनिल अतुलकुमार मोदी (24, मेहसाणा, गुजरात), रवी गोकुल प्रसाद जाट (22, राजगड, मध्यप्रदेश), ऋषभपाल सिंग गजेंद्रसिंग चौहान (22, खंडवा, मध्यप्रदेश) आणि हंश कैलास वर्मा (19, बोरीवली, मुंबई) अशी आहेत. (Fraud News)

नेमके प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बनावट ऑफर लेटर आणि कागदपत्रांच्या माध्यमातून तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवत होते. त्यानंतर ‘USDT’ या क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जात होते.

या प्रकरणात सुमारे 97 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद आहे. आजवर अनेकांना एक कोटी रुपयांहून अधिकचा गंडा घातल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. तपासात ही रक्कम गुजरातमधील खात्यांमध्ये ट्रान्सफर झाल्याचे उघड झाले असून, त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये ती फिरवण्यात आली. दरम्यान, लोणावळ्यातील एका व्हिलावर छापा टाकून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान एक लॅपटॉप, सात मोबाईल, 14 डेबिट कार्ड, वेब कॅमेरे, बँक खाते किट आणि बनावट स्टॅम्प असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय सायबर नेटवर्क?

या टोळीमागे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, आरोपी परदेशातून मिळणाऱ्या सूचनांनुसार काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, नागरिकांनी परदेशी नोकरीच्या आमिषाला बळी न पडता आवश्यक ती पडताळणी करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मित्राचा भर चौकात काटा काढला, पुणे हादरलं!

किरकोळ वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचे धक्कादायक उदाहरण पुण्यात (Pune News) समोर आले आहे. सिंहगड रोड (Pune Sinhagad Road) परिसरात सोमवारी संध्याकाळी तीन अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने हल्ला करत 19 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी संध्याकाळी भर चौकात ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, तिघांनी अचानक करणवर हल्ला चढवत त्याच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आणखी वाचा

Comments are closed.