तू माझ्याकडे का पाहतोय म्हणत पानपट्टीवर राडा, 6 तासांत पोलिसांकडून रक्तरंजित गुन्ह्याची उकल
अकोला क्राईम न्यूज : अकोला शहरातील डाबकी रोडवर मध्यरात्री झालेल्या तरुणाच्या हत्येचा छडा अकोला पोलिसांनी फक्त सहा तासात लावलाय. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीये. अर्जुन धनावत, अनिकेत बाळापुरे आणि विशाल सिरसोले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या हत्या प्रकरणाची पत्रकार परिषद घेत माहिती दिलीये. डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या श्रीराम टॉवर परिसरात बुधवारी रात्री झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर प्राणघातक हल्ल्यात झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महवीश खान पठाण या तरुणाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यानआरोपींच्या शोधासाठी पाच पथक तयार करण्यात आली होती. आरोपींनी पानपट्टीवर मृतकासोबत वाद घालत, तू माझ्याकडे का पाहतो?, एवढ्या शुल्लक कारणावरून त्याची हत्या केलीये. डाबकीरोडवरील श्रीराम टॉवर परिसरातील एका पानपट्टीवर दोन तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद अचानक उग्र झाला आणि त्यातून तीन आरोपींनी महवीश खान पठाण याच्यावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केलाय. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. तिघांनाही एका अज्ञास्थळावरून पोलिसांनी शिताफीने अटक केलीये.
Bhandara Crime : वाळू घाटांवर बंदी असतानाही चोरटी वाहतूक, पाच टिप्परसह चालकांना घेतलं ताब्यात
पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता हरित लवादान भंडाऱ्यातील सर्व वाळू घाटांवरील उपसा बंद केला आहे. असं असतानाही भंडारा जिल्ह्यातील वाळूचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा करून त्याची चोरटी वाहतूक सुरू असताना वरठी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई करताना ५ टिप्पर आणि त्याचे ५ चालक ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईत एकूण ५० ब्रास वाळू साठ्यासह ५ टिप्पर असा ३ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Bhusawal News : भुसावळ येथे 19 हॉटेल वर छापे; 12 घरगुती सिलेंडर जप्त, तहसील कार्यालयाची कारवाई
घरगुती गॅस चा काळाबाजार रोखण्यासाठी भुसावळ महसूल विभागाच्या वतीने पथक नेमण्यात आली ठिकठिकाणी सकाळपासून महसूल विभाग छापेमारी करत आहे यात छोटे-मोठे हॉटेल व्यवसाय घरगुती गॅसचा वापर करत असून हे रोखण्यासाठी भुसावळ महसूल विभागाच्या वतीने पथक नेमण्यात आली आहे आज19 हॉटेल वर छापे टाकत12 घरगुती सिलेंडर जप्त तहसील विभागाने कारवाई केली आहे
आणखी वाचा
Comments are closed.