नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.  ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळी महाराष्ट्रभर निवडणुकीचे वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो.सर्वदूर एकट्या धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी जे काही येईल त्याकरिता महाराष्ट्रातील मोठं मोठे नेते सर्व काही करत होते, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी परळी नगरपालिकेच्या एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

Dhananjay Munde : धनंजय मुंडे काय म्हणाले?

राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळी महाराष्ट्रभर निवडणुकीचे वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. सर्वदूर एकट्या धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी जे काही येईल त्याकरिता महाराष्ट्रातील मोठे मोठे मोठे नेते सर्व काही करत होते, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं.

शेवटी मला वाटलं आपल्या मध्ये काहीतरी नक्कीच आहे. त्याशिवाय आपल्याला संपवायला हे निघाले? त्यांना असं वाटत असावं, हा बाबा आपल्याला पुरून उरेल, असंही मुंडेंनी म्हटलं. त्या परिस्थितीत एवढं वातावरण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, युट्युबचे चॅनल असतील एवढं घाण केलेलं तशा परिस्थितीत सुद्धा परळीच्या मायबाप जनतेने महायुतीच्या मागं भरभक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं.

धनंजय मुंडे यापुढं परळीच्या निवडणुकीबद्दल बोलताना म्हणाले की नगराध्यक्षपदाचे आपले विजयी उमेदवार मोठ्या मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत.बाकी नगरसेवक मला माहिती आहेत, कोण किती फरकानं आलेय आणि कोण किती फरकानं गेलेत. काही नगरसेवकांना माहितीही नाही तो कसा निवडून आला, मला एकट्यालाच माहिती आहे. ही पहिली वेळ नाही, ज्याला पाडलाय त्याला तसाच निवडून आणला होता, जो निवडून आलाय त्यालाही माहिती नाही तो कसा निवडून आला होता, असं धनंजय मुंडे म्हणाले.

आपण सर्वांनी कष्ट घेतल्यानं परळीच्या मायबाप जनतेनं जबाबदारी दिली आहे.  परळीच्या जनतेनं जी जबाबदारी दिली आहे ती यशस्वीपणे पार पाडायची आहे. जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असताना परळी नगरपरिषदेला आणि आपल्या या नगरीला हळू हळू कामाच्या बाबतीत,करांच्या बाबतीत शिस्तीत बसवावं लागेल. म्हणजे पुढे चालून मोठमोठ्या योजना आणता येतील, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.