एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असतील तर तो गुन्हा आहे का? पुराव्यासह सगळी उत्तर देणार : रुपाली चाकणकर
रुपाली चाकणकर : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून संतापाची लाट उसळली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली चाकणकर (रुपाली चाकणकर) यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांकडून चाकणकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच रुपाली चाकणकर लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सध्या निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असल्याची माहिती चाकणकर यांनी एबीपी माझाला दिली आहे.
नेमक्या काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
एखाद्या व्यक्ती सोबत फोटो असतील तर तो गुन्हा आहे का? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केला आहे. सध्या निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची पुराव्यासह उत्तर देणार असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. नुकतीच रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची मुंबईत भेट घेऊन प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर चाकणकर आता पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. पुण्यात जाऊन त्या सुनेत्रा पवार यांची देखील आजच भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीत नाशिक भोंदू गिरी प्रकरणाबाबत त्यांचं म्हणणं स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळात आहे.
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अन्यथा उपोषणाला बसणार : लक्ष्मण हाके
सुनेत्रा पवारांनी रूपाली चाकणकर यांचा उद्या दुपारी बाजार बारा वाजेपर्यंत राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर उपोषणाला बसू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. तसेच महायुतीने आमची फसवणूक केली असल्याचा आरोप देखील ओबीसी आरक्षणावरून हाके यांनी केला आहे. सातारा जिल्हा परिषदेवरती ओबीसींना डावलून अध्यक्ष बसवला त्यामुळे आम्ही जयकुमार गोरे यांना ओबीसीचे नेता मानत नाही. छगन भुजबळ ओबीसी चे नेते आहेत. पण ते का शांत आहेत हे देखील आम्हाला समजत नाही. बारामतीची निवडणूक आम्ही लढणार असल्याचे लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे. ओबीसींच्या प्रश्नासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Ashok Kharat : अशोक खरातचे बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात, कॅप्टनचे आणखी कांड उजेडात येणार?
आणखी वाचा
Comments are closed.