नाशिक भोंदूबाबा प्रकरण! रुपाली चाकणकर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल, राजीनामा देणार का?

रुपाली चाकणकर : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तर त्याच्यासोबतचे छत्री धरलेला फोटोही समोर आला होता. त्यानंतर चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे. अशातच थोड्याच वेळात रुपाली चाकणकर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत नाशिक भोंदू गिरी प्रकरणाबाबत त्यांचं म्हणणं स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळात आहे. रुपाली चाकणकर यांनी नुकतीच पुणे डीजी यांची भेट घेतली असून आता सुनेत्रा पवार यांच्या भेटीला जात आहेत.

रुपाली चाकणकरांचा उद्या दुपारी बाजार बारा वाजेपर्यंत राजीनामा घ्यावा अन्यथा उपोषणाला बसणार : लक्ष्मण हाके

सुनेत्रा पवारांनी रूपाली चाकणकर यांचा उद्या दुपारी बाजार बारा वाजेपर्यंत राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर उपोषणाला बसू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. तसेच महायुतीने आमची फसवणूक केली असल्याचा आरोप देखील ओबीसी आरक्षणावरून हाके यांनी केला आहे. सातारा जिल्हा परिषदेवरती ओबीसींना डावलून अध्यक्ष बसवला त्यामुळे आम्ही जयकुमार गोरे यांना ओबीसीचे नेता मानत नाही. छगन भुजबळ ओबीसी चे नेते आहेत. पण ते का शांत आहेत हे देखील आम्हाला समजत नाही. बारामतीची निवडणूक आम्ही लढणार असल्याचे लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे. ओबीसींच्या प्रश्नासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करा, सुषमा अंधारेंची मागणी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. सीएमओ कार्यालयाकडून याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अगोदरच IPS तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे सखोल तपास करण्यात आले आहे. त्यामुळं आता चाकणकर यांच्यावर काही कारवाई होणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करण्याची मागणी उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. तसेच चाकणकरांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. तर खरात आणि चाकणकर यांचे व्यावसायिक संबंध होते का, याविषयी तपास करण्याची मागणी त्यांनी केली

आणखी वाचा

Comments are closed.