ह्रदयद्रावक… मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तीन ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार

पालघर: जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दिवसभरात अपघाताच्या (Accident) दोन घटना घडल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस (Police) तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. दुसरीकडे वसईतील सुसुपाडा येथे 4 वाहनांचा (Car Accident) भीषण अपघात झाला आहे. कंटेनर, दोन कार आणि एक टेम्पो अशी एकूण चार वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.

ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात घडलेल्या अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. मनोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवले आहेत. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरुन फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पुढील तपास सुरू आहे.

4 वाहने एकमेकांवर आदळली

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 4 वाहनाचा भीषण अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसईतील ससुपाडा परिसरात आज दुपारच्या सुमारास हा  भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर, दोन कार आणि एक टेम्पो अशी एकूण चार वाहने एकमेकांवर आदळल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून, मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. तसेच पोलीस घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

हेही वाचा

धक्कादायक! 70 वर्षीय नराधमाकडून 12 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, बुलढाण्यात संतापजनक घटना

आणखी वाचा

Comments are closed.