नाशिक भोंदूबाबा प्रकरण! केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील : गोगावले
Bharat Gogawale on Deepak Kesarkar : नाशिकचा भोंदूबाबा प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांचे फोटो अशोक खरात सोबत व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. अशातच दीपक केसरकर यांचा देखील अशोक खरातसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केसरकरांकडून काही चुकीचे घडले असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील असं सूचक वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं आहे.
दीपक केसरकर यांच्या राजीनामाची मागणी होतेय
अशोक खरात प्रकरणात आता रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर, दीपक केसरकर यांच्या राजीनामाची मागणी होत आहे. संजय राऊत यांनीही केसरकर यांचा राजीनामा मागितला आहे. यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांनी केसरकर यांच्याकडून काही चुका घडल्या असतीलल तर याबाबतचे धोरण एकनाथ शिंदे ठरवतील, असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळं चाकणकरानंतर अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकर यांचाही राजीनामा घेतला जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी भरत गोगावले यांनी साधला संवाद
सोलापूर जिल्ह्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडकलेल्या कोट्यावधी रुपयांच्या फळांबाबत गोगावले यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. युद्धजन्य परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी डाळिंब द्राक्ष असा कोट्यावधी रुपयांचा माल जेएनपीटी बंदरात अडकून पडला असून पहिल्या गेलेल्या मालाचेही पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. याबाबत नंतर शेतकऱ्यांशी गोगावले यांनी संवाद बैठक घेतली. यात लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक घेऊन युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे होत असलेल्या नुकसानीबाबत निर्णय केला जाईल असे आश्वासन गोगावले यांनी दिले आहे. युद्धामुळे माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पडून असलेल्या केळी, आंबा ,पेरू आदी फळ बागांची पाहणी फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी केली.
केसरकर काय म्हणाले?
अशोक खरात त्यांचे कृत्य घृणास्पद आहे, त्याचा निषेध करतो. मात्र, त्यांच्या ओळखीच्या लोकांना यात गुंतवणे आणि फोटो प्रसिद्ध करणे ही चुकीची बाब आहे असे दीपक केसरकर म्हणाले. अशोक खरातसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि मी एकत्र असल्याचा फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, असे म्हणत केसरकर यांनी व्हायरल फोटोमागची स्टोरी सांगितली आहे. ईशान्येश्वर मंदिरासाठी एक रस्ता बनविण्यासंदर्भात अशोक खरात एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हाच माझी आणि त्यांची ओळख झाली असे केसकरकरांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:
अशोक खरातसोबतचा फोटो, एकनाथ शिंदेही उपस्थित; व्हायरल फोटोवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण
आणखी वाचा
Comments are closed.