संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार, 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक

बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे (Massajog Election) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घुण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची आता पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 28 एप्रिल रोजी मतदान आणि 29 एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार असून मस्साजोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख सक्रिय असून सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र मस्साजोग ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना आदरांजली वाहणार विरोधात उमेदवार उभा राहणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

7 ते 13 एप्रिल

अर्जाची छाननी – 15 एप्रिल

अर्ज मागे घेण्याची तारीख – 17 एप्रिल

मतदान – 28 एप्रिल

निकाल – 29 एप्रिल

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कधी आणि कशी झाली?

बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी कथितरीत्या अपहरण करून छळ करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. जिल्ह्यातील एका कंपनीकडून सुरू असलेला खंडणी वसुलीचा प्रयत्न रोखल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) २७ फेब्रुवारी रोजी देशमुख यांची हत्या आणि इतर दोन संबंधित प्रकरणांत बीड जिल्हा न्यायालयात १,२०० हून अधिक पानांचे आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केले आहे.

सरपंचाची हत्या, ‘अवादा’ (Avaada) कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याप्रकारचे तीन वेगळे गुन्हे बीडच्या केज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

वाल्मिक कराड व्यतिरिक्त ‘हे’ आरोपीही अटकेत

अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनावणे, सुधीर सांगले आणि प्रतीक घुले यांचा समावेश आहे. या प्रकरणात कृष्णा आंधळे हा अद्याप फरार (WANTED) आहे. मृत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांसाठी न्यायाची मागणी केली होती.

तर वाल्मिक कराड हा परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष असून तो मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. याच कारणामुळे विरोधकांनी या हत्येच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

आणखी वाचा

Comments are closed.