मी अशोक खरातचा पीए नाही; कथित स्वीय सहायक रमेश हिंगेंनं ईशान्येवर मंदिराचं सगळं सांगितलं
मुंबई: महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयाने आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, 29 एप्रिलपर्यंत त्याचा मुक्काम एसआयटी कोठडीत वाढला असून एसआयटी (SIT) पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशोक खरातच्या शिवनिका संस्थेच्या सदस्यांची आणि प्रकरणाशी संबंधितांची चौकशी केली जाईल, अशी माहिती विधानसभा सभागृहात दिली. तर, दुसरीकडे अशोक खरातचा तथाकथित पीए रमेश हिंगे यानेही मीडियासमोर येऊन भूमिका मांडली. तसेच, मी अशोक खरातचा पीए नसून ईशान्येश्वर मंदिरातील स्वयंसेवक असल्याचेही हिंगेने म्हटले.
मी कॅप्टन खरातचा पीए नाही, आणि शिवनिका संस्थेचा विश्वस्त देखील नाही. मी कुठेही फरार नसून मी शाळेत शिक्षक आहे, माझं काम मी करतोय. केवळ सुट्टीच्या दिवशी ईशानेश्वर मंदिरात मी स्वयंसेवक म्हणून काम करायचो, अशी माहिती कथित स्वीय सहायक रमेश हिंगे याने दिली. माझे खरात बरोबर आर्थिक व्यवहार नाही आणि कसलीही भागीदारी देखील नाही. त्यामुळे, मला चौकशीसाठी बोलावलं तर मी चौकशीसाठी जायला तयार असल्याचेही हिंगे याने माध्यमांशी बोलताना म्हटले.
भोंदूबाबा अशोक खरातला अनेक बड्या लोकांचं सहकार्य लाभलं असून चक्क राज्य सरकारनेही त्याचा संस्थेला आर्थिक निधीच्या माध्यमातून सहकार्य केल्याची माहिती आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातने ज्या ठिकाणी विकृतीचा कळस गाठला, त्याचं बांधकाम हे सरकारी खर्चातून झालं असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे पर्यटनाचा निधी मंदिरासाठी दिल्याचा आरोप करत खरात हा सरकार पुरस्कृत बाबा असल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
अशोक खरातवर बलात्काराचा गुन्हा
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.