रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेत सांगितलं गौडबंगाल

मुंबई : मी दोन पांढरे तुकडे आणले आहेत एक चीज आणि दुसरे पनीर आहे. आपल्याकडे चीज ॲनॉलॉग विकायला कुठलीही बंदी नाही, आपण रेस्टॉरंटमध्ये पनीरची ऑर्डर देतो, ते चीज ॲनॉलॉग आहे का हे माहिती नाही. चीज ॲनॉलॉग हे शरीरासाठी घातक आहे, रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डवर पनीर विकताय की चीज ॲनॉलॉग विकताय हे कळत नाही, असे म्हणत बाजारात, हॉटेलमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग ग्राहकांना दिलं जात असल्याचं भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिलंय.

एफडीएने एक परिपत्रक काढले आहे, त्यात प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कार्डवर चीज ॲनॉलॉग विकत असतील तर ते नमूद करावे लागेल. पनीर सँडविच नव्हे तर चीज ॲनॉलॉग सँडविच म्हणावे लागेल, असे त्या परिपत्रकात लिहिलं आहे. 1 मे पूर्वी हा उल्लेख करावा लागेल, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, ज्यांनी हे परिपत्रक काढले आहे. येत्या काळात केंद्र याबाबत कायदा करणार आहे. जनतेचे व डेअरी इंडस्ट्रीकडून सूचना व हरकत मागवल्या आहेत.

चीज ॲनॉलॉगमध्ये ॲनॉलॉग हा शब्द बारिक लिहिला जाऊ शकतो म्हणून हरकत नोंदवली आहे. जर रेस्टॉरंटने चीज ॲनॉलॉग नमूद केले नाही तर एफडीए त्यांचे परवाने रद्द करू शकतात.चीज अॅनॉलॉगचे दुष्परिणाम खूप आहेत, त्यात तेल खूप असते. बीफचा देखील वापर केला जातो, अशी माहिती विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत दिली.

दुग्धजन्य चीजची चव

दरम्यान, अलीकडे बाजारात भेसळयुक्त पदार्थांचा मोठा वापर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात. पारंपरिक दुग्धजन्य चीजची चव, पोत आणि वितळण्याची क्षमता यांचे अनुकरण करण्यासाठी वनस्पती-आधारित घटकांचा वापर करून चीज अनालॉग्स तयार केले जातात. बहुतेकदा नट्स, सोया, टॅपिओका यांसारख्या वनस्पती-आधारित स्रोतांपासून किंवा या घटकांच्या मिश्रणातून बनवले जातात. मात्र, बाजारात, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ते चीज अनालॉग हे पनीर म्हणून खायला दिलं जातं.

हेही वाचा

मी अशोक खरातचा पीए नाही; कथित स्वीय सहायक रमेश हिंगेंनं सगळं सांगितलं, ईशान्येवर मंदिराचं नाव घेतलं

आणखी वाचा

Comments are closed.