रोहित पवारांनी आधी दादांच्या विरोधात कारस्थान केलं, आता वहिनींच्या विरोधात काम : सुनील तटकरे
मुंबई : रोहित पवारांनी (Rohit Pawar) आधी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे पाहावं, त्यांनी अजितदादा आणि सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काय काय कारस्थान केली हे आमच्या सहकाऱ्यांना माहिती आहे. उगाच आम्हाला बोलायला लावू नका असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिला. रोहित पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर आरोप केले होते. त्यावर तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं.
सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीचा ताबा घ्यायचा होता असा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यावर सुनील तटकरेंनी रोहित पवारांना प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे.
पक्ष ताब्यात घेण्याची घाई
रोहित पवारांना पक्ष ताब्यात घेण्यासाठी घाई झाली होती असा आरोप सुनील तटकरे यांनी केला. ते म्हणाले की, “रोहित पवारांचे प्रत्येक दिवस प्रसिद्धीसाठी काही ना काही सुरू असतं. जयंत पाटील 40 वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्या हकालपट्टीची मागणी शिर्डीच्या अधिवेशनात केली होती. त्यांनी आता आमच्या पक्षाबद्दल बोलणं थांबवावं, त्यांच्या पक्षात काय सुरू आहे ते पाहावं.”
दादांच्या विरोधात जे कटकारस्थानं झाली तीच कारस्थानं आता सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्याविरोधात केली जात आहेत. पण ती जनतेने हाणून पाडल्याने रोहित पवरा अस्वस्थ होत आहेत, असा आरोप सुनील तटकरेंनी केला.
दादा असतानाही मला टार्गेट करण्यात आलं होतं. आम्ही दादांना सावलीसारखी साथ दिली होती. दादांनी त्यांच्या कार्यामुळे पक्ष संघटनेवर पकड मिळवली होती. त्यामध्ये आमचा सहभाग असल्यामुळे आम्हाला टार्गेट केला जात आहे असा आरोप तटकरेंनी केला.
यांची सगळी कारस्थानं माहिती
रोहित पवारांवर आरोप करताना सुनील तटकरे म्हणाले की, “दादांचा अपघात झाल्यानंतर त्यांचं शव हे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर, पोर्टमॉर्टमपर्यंत काय कट-कारस्थानं करण्यात आली होती, त्याची माहिती आपल्याकडे आहे. त्यामुळे आता त्यांनी थांबावं, अन्यथा सुनेत्रा वहिनी, जय-पार्थच्या विरोधात कुणी काय केलं याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी आता शांत बसावं.”
काळाच्या ओघात त्यांना जनतेनं नाकारलं. रोहित पवारांनी महाराष्ट्राचा दौरा काढला, पण त्यातून काहीही मिळालं नाही. आमचा एखादा युवक जिल्हाध्यक्ष गेला तरी त्यांच्यापेक्षा जास्त गर्दी होते. त्यामुळे अस्वस्थ होऊन काविळ झाल्यासारखं वक्तव्य केली जात आहेत, असं तटकरे म्हणाले.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.