सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन जखमी

धुळे : सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी आणि ह्रदद्रावक घटना घढली. जिल्ह्यातील (Dhule) शिरपूरकडून सप्तशृंगी गडाकडे पायी जाणाऱ्या भाविकांना चार चाकी वाहनाने चिरडल्याने या अपघातात (Accident) एका 35 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन भाविक गंभीरित्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर पायी यात्रेतील इतर बांधवांनी संताप व्यक्त करत तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली.

अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आमदार काशीराम पावरा यांनी तात्काळ रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली. शिरपूर तालुक्यातील दहिवद फाटा येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील आज रोजी ही दुर्घटना घडली. मध्य प्रदेशकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनाने भाविकांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली.

खरातचे व्हिडिओ शेअर करु नका

भोंदू बाबा कॅप्टन खरात प्रकरणात पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. कोपरगाव तालुक्यात ही करावाई करण्यात आली. एका आरोपीचा शोध अद्यापही सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. तपासा दरम्यान एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर संबंधित पीडित महिलेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असून यामध्ये अनेक महिला पीडित असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये, यासाठी नागरिकांनी असे व्हिडिओ पुढे शेअर करू नयेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांच्याकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.