शक्तिवर्धक गोळ्या खाऊन अशोक खरातला अर्धांग वायूचा आलेला झटका; एका हाताची हालचाल मर्यादित, भुवईत
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या ओकस कार्यालयावर एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळं ठोकण्यात आलं आहे. एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमने कार्यालयाची सखोल पाहणी केली असून तपासाला वेग दिला आहे. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
भोंदूबाबा अशोक खरातबाबत आणखी एक खुलासा समोर आला आहे. अपघात आणि अर्धांग वायूच्या झटक्यानं अशोक खरात बेजार झाला होता. दीड वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. उत्तेजक (शक्तिवर्धक) औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर अशोक खरातने शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.डॉक्टर भक्ताने वेळीच उपचार करून जीव वाचवला. आजही एका हाताची हालचाल मर्यादित झाली होती. भुवईत बदल दिसून येत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच उत्तेजक औषध घेणं अशोक खरातला जीवावर बेतलं असतं. अशोक खरातच्या तपासातून महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर येण्याची शक्यता आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट समोर- (Ashok Kharat HIV Test)
पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह (Ashok Kharat HIV Test) आली आहे. भविष्य सांगण्याचा बहाण्याने अशोक खरात याने 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे, नाशिक पोलिसांत दाखल झालेल्या 8 गुन्ह्या पैकी 7 गुन्हे महिला अत्याचार संदर्भात आहे. गुन्हा दाखल केलेल्या महिला व्यतिरिक्त इतर महिला अद्याप तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाही. अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याने पिढीत महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्हाशी सबंधीत सर्व बाजूचा विचार करून तपास करत आहेत. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
मोबाईलमधील महत्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती लागणार- (Ashok Kharat Case)
अशोक खरातचा मोबाईल तपास पथकाने ताब्यात घेत मोबाईलमधील डेटा रिकव्हर करत महत्वाचे पुरावे पथकाला मिळणार असल्याची माहिती आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरातची महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. SIT कडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून भोंदू अशोक खरात याचा मोबाईल देखील SIT ने जप्त केला आहे.
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज
अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहे. गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला?, तपास यंत्रणांचा शोध सुरू आहे. शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.