जामीन मिळवण्यासाठी अशोक खरातच्या वकिलाचा आटापिटा, जोरदार युक्तिवाद, तरीही कोर्टाने भोंदूबाबाला
Ashok Kharat Nashik Court Hearing: महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाची सुनावणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात (Nashik Court) पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद आणि खरातचे चौकशीतील उडवाउडवीची उत्तरे यावरून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. “अशोक खरात हा मास्टरमाईंड असून तो पोलिसांना तपासात अजिबात सहकार्य करत नाही. तो उडवाउडवीची उत्तरे देतो,” अशा शब्दांत सरकारी वकिलांनी खरातच्या वर्तणुकीचा पाढा वाचला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातची 1 एप्रिलपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. भोंदू अशोक खरात याला वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली याचे कारणेसमोर आली आहेत.
Ashok Kharat Nashik Court Hearing: खरातला वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली याचे कारणे
– भोंदु अशोक खरात हा तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही म्हणून लागणारा अधिकचा वेळ.
– अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर केला आहे त्याची समक्ष चौकशी करायची आहे.
– महिलांचे लैंगिक शोषण करत असताना महिलांना खाण्यासाठी पेढे, पिण्यासाठी खारट कडवट पाणी देत होता. ही खाल्ल-पिल्यानंतर महिलांना मळमळ, गरगर होत डोके जड व्हायचे आणि भोंदू अशोक खरात सांगायचा तसे ह्या महिला करत होत्या, हे नेमकं काय आहे याचा तपास करायचा आहे. आरोपी अशोक खरात याबद्दल कोणतीही माहिती देत नाही त्याचा तपास करायचा आहे.
– अशोक खरात ने भोंदूगिरी करत किती आणि कोठे कोणाच्या नावावर मालमत्ता जमा केली खरेदी केली याचा तपास करायचा आहे.
– अशोक खरात याने जे कृत्य केले जे गंभीर गुन्हे केले यात खराताला कोणी मदत केली आहे. का? याचा तपास करायचा असल्याने वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .
– महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण मोठे आहे तपास प्राथमिक अस्वस्थेत आहे. आरोपीकडून गुन्ह्याची माहिती घेऊन डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, आणि इतर पीडित महिलांची माहिती येणे बाकी आहे. या कारणास्तव आरोपी अशोक खरात याला वाढीव पोलीस कोठडी दिली आहे.
Ashok Kharat Nashik Court Hearing: सरकारी वकिलांनी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी लावून धरली
न्यायमूर्ती एम. व्ही. भराडे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी लावून धरली. सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी कोर्टात सांगितले की, आरोपी हा मास्टरमाईंड आहे. तपास अधिकाऱ्यांना तो सहकार्य करत नाही. त्याचा मोबाईल डेटा बघायचा आहे. जंगम मालमत्ता तपासायची आहे. त्याला समोर घेऊन समक्ष तपास करायचा आहे. महिलांना पाणी देत होता, त्याचा तपास करायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह बाहेर देखील त्याची चर्चा आहे. या प्रकरणाची मोठी व्याप्ती आहे. पीडित महिला समोर येत आहे. मोबाईल डेटा रिकव्हर करायचा आहे. त्यामुळे तीन दिवस कोठडी देण्यात यावी. लबाडी करून असंख्य महिलांचे आयुष्य त्याने उद्ध्वस्त केले. यासाठी कोठडी द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
एसआयटीचे (SIT) तपासी अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी आरोपीला समक्ष घेऊन तपास करायचा आहे. काही कॉर्डवर्ड आहे. त्याचा तपास करायचा आहे. तीन दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. यानंतर सरकारी वकील म्हणाले की, आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे. मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासाठी आरोपी पाहिजे. क्लोन कॉपी आम्ही घेतली आहे. पण त्याने नावे डमी वापरल्याची शक्यता आहे. काही राजकीय लोकांची नावे डमी नावाने वापरली असेल, त्यामुळे रिमांड हवा. फॉरेन्सिक टीमकडून रिकव्हरी केली जात आहे, असे त्यांनी म्हटले.
Ashok Kharat Nashik Court Hearing: काय म्हणाले पीडितेचे वकील?
पीडित महिलेच्या वतीने ॲड. एम. वाय. काळे यांनी बाजू मांडताना सांगितले की, आरोपी तपासात सहकार्य करत नाही. योग्य उत्तर देत नाही. त्यामुळे तपास अर्धवट आहे. तो सहकार्य करत नाही त्यामुळे तपास अर्धवट आहे. गुन्ह्याचे स्वरूप समाजाच्या वतीने योग्य नाही. यंत्रणांना तपास करण्यासाठी अधिक कालावधीची गरज आहे. पीडितांना न्याय देण्याची गरज आहे. पीडितेच्या कुटुंब अस्वस्थ झाले आहेत. तिचे आयुष्य अडचणीत आले आहेत. आरोपी शोध पथकाला सहकार्य करत नसल्याने अधिकाधिक दिवस त्यांना मिळायला हवा. समाजाला न्याय मिळणे अत्यावश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या अनेक निकालावरून अशा व्यक्तीला अधिकाधिक पोलिस कोठडी देण्याचे निर्देश आहेत, असे त्यांनी म्हटले.
Ashok Kharat Nashik Court Hearing: अशोक खरातचे वकील काय म्हणाले?
आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. जी कारणे सांगितले जात आहे, आरोपीचे मोबाईलचे विश्लेषण करायचे आहे. मग या आधी काय केले? मागील सुनावणीमध्ये पेन ड्राइव्ह आणि व्हिडीओ देखील जप्त नाही, मग काय केले? द्रव्य पाजले ते पहिल्या रिमांडमध्ये बोलले होते. त्यानुसार मेहेरबान कोर्टाने रिमांड दिली. मालमत्तेच्या बाबतीत दुसऱ्या रिमांडमध्ये बोलले होते. काळ्या रंगाच्या रिव्हॉल्व्हरचा परवाना आरोपीकडे होता. मोबाईलची क्लोन कॉपी मिळाली, जप्त नाही असे सांगतात. वाढीव कोठडीच्या मागणीची गरज नाही. वाढीव पोलीस कोठडीचा अर्ज रद्द करा, असा युक्तिवाद त्यांनी केला.
Ashok Kharat Nashik Court Hearing: खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
तर सरकारी पक्षाने मांडलेले मुद्दे आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या वाढीव कोठडीत खरातच्या ‘कोडवर्ड’चे आणि आर्थिक साम्राज्याचे कोणते नवीन रहस्य उलगडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.