Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
अशोक खरात नाशिक कोर्टात सुनावणी : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाची सुनावणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात (Nashik Court) पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद आणि खरातचे चौकशीतील उडवाउडवीची उत्तरे यावरून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. “अशोक खरात हा मास्टरमाईंड असून तो पोलिसांना तपासात अजिबात सहकार्य करत नाही. तो उडवाउडवीची उत्तरे देतो,” अशा शब्दांत सरकारी वकिलांनी खरातच्या वर्तणुकीचा पाढा वाचला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातची 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
न्यायमूर्ती एम. व्ही. भराडे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी लावून धरली. सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी कोर्टात सांगितले की, आरोपी हा मास्टरमाईंड आहे. तपास अधिकाऱ्यांना तो सहकार्य करत नाही. त्याचा मोबाईल डेटा बघायचा आहे. जंगम मालमत्ता तपासायची आहे. त्याला समोर घेऊन समक्ष तपास करायचा आहे. महिलांना पाणी देत होता, त्याचा तपास करायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह बाहेर देखील त्याची चर्चा आहे. या प्रकरणाची मोठी व्याप्ती आहे. पीडित महिला समोर येत आहे. मोबाईल डेटा रिकव्हर करायचा आहे. त्यामुळे तीन दिवस कोठडी देण्यात यावी. लबाडी करून असंख्य महिलांचे आयुष्य त्याने उद्ध्वस्त केले. यासाठी कोठडी द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Comments are closed.