दुचाकीवरून जाताना 5 युवकांनी अडविले, नंतर 18 वर्षीय तरुणीसोबत नको ते कृत्य, मित्रालाही लाथाबुक्

अमरावती क्राईम न्यूज : अमरावती जिल्ह्यातील भानखेडा रोडवरील जंगल परिसरात एका 18 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरून जात असताना पाच जणांच्या टोळीने त्यांना अडवून ही हैवानियत केली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तत्परता दाखवत पाचही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती तिच्या मित्रासोबत दुचाकीने भानखेडा रोडवरून जात होती. यावेळी पाच तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या नराधमांनी केवळ मारहाणच केली नाही, तर पीडितेच्या मित्राच्या खिशातील 120 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर, त्यातील एका आरोपीने पीडित तरुणीवर बळजबरीने अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Amravati Crime News: पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु

अत्याचाराच्या या भीषण घटनेनंतर पीडित तरुणीची प्रकृती खालावली होती. तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासचक्र फिरवण्यात आली.

Amravati Crime News: पाचही संशयित आरोपींना अटक

फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल केला असून, शोधमोहीम राबवून पाचही संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास फ्रेजरपुरा पोलीस करत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Beed Crime News: ग्रामसभेदरम्यान दोन गटात हाणामारी; बीडमधील घटना

दरम्यान, बीड तालुक्यातील कुमशी गावात दोन गट आपापसात भिडल्याने पाच जण जखमी आहेत. त्यातील दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुमशी गावात ग्रामसभेदरम्यान करपे नामक गटाने गावातील कामांबाबत सरपंचाच्या गटाला जाब विचारला. यावरूनच दोन्ही गटात वाद निर्माण झाला एकमेकांवर दगडफेक, लाठ्या काठ्या आणि कोयत्याने मारहाण करण्यात आली. मारहाणीत महिलांचा देखील समावेश आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय. जखमी व्यक्तींवर उपचार सुरू असून पोलिसांकडून जखमींचा जबाब घेतला जातोय. पोलीस तपासात परस्पर विरोधी गुन्हा नोंदवला जाईल, अशी माहिती देण्यात आली.

आणखी वाचा

Ashok Kharat Nashik Crime News: कोर्टात आणताच न्यायमूर्तींनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा अशोक खरातचं एका शब्दात उत्तर; म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.