मदतीसाठी आलेल्या लोकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आ
एलपीजी गॅस सिलेंडरवर मंगलप्रभात लोढा: राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी जैन बांधवांच्या (Jain Community) उत्सवासाठी मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी पाच गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र राज्य सरकारला पाठवल्यामुळे वादंग निर्माण झाला होता. यावरुन विरोधकांनी लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मंगलप्रभात लोढा संपूर्ण राज्याचे मंत्री असताना फक्त एका धर्मासाठी अशी मागणी कशी करु शकतात, असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आता मंगलप्रभात लोढा यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे. (Maharashtra Politics news)
हिंदू सणाच्यावेळी आणि धार्मिक कार्यक्रमांवेळी टीका करायची ही एक फॅशन झाली आहे. माझ्यावर झालेली टीका त्याच नरेटिव्हचा भाग असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले. माझ्या मतदारसंघात रामनवमी, साई भंडाराजैन धर्माचा कार्यक्रम हे विशेष धार्मिक कार्यक्रम आहे. त्यासाठी गॅसचा साठा नव्हता तर विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते. माझ्याकडे साई भंडाऱ्याचे लोक आले होते, जैन धर्मीय लोक आले होते. मग त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा नाही का? मी त्यासाठी प्रयत्न केला तर काही चुकले का? 2 तारखेला हनुमान जयंती आहे, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यासाठी विशेष धार्मिक कार्यक्रम असल्याने मला प्रयत्न करावा लागणारच आहे. माझी आमदार म्हणून ती जबाबदारी आहे. त्यामध्ये कोणाला गैर वाटत असेल किंवा कोणाला वाद निर्माण करायचा असेल तर त्याने करावा. मी जबाबदारीपासून पळ काढणार नाही. राज्यात गॅसचा तुटवडा नाही, राज्य सरकार चांगलं काम करत आहे. फक्त विशेष धार्मिक कार्यक्रमांच्यावेळी गॅस सिलेंडर मिळवायला प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे तेढ निर्माण करणे सोडा, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले.
MNS LPG Gas Cylinder: मंगलप्रभात लोढांच्या भूमिकेवर मनसे आक्रमक
मंगलप्रभात लोढा यांच्या या पत्रावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतला. मनसेनं थेट गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना पत्र लिहून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला. तसंच एका विशिष्ट समाजासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करून, गॅसचा काळाबाजार झाल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.