भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात विविध मुद्यांवर भाष्य केलं. या मुलाखतीत सुनील तटकरे यांनी नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा, अशोक खरातची भेट यावर भूमिका स्पष्ट केली. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे यात कोणाचं दुमत नव्हतं, असं सुनील तटकरे म्हणाले.
रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर तटकरे काय म्हणाले?
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे यात कोणाच्या मनामध्ये दुमत नव्हतं, असं सुनील तटकरे म्हणाले. एक दोन दिवसानं की तीन दिवसांनी मला माहिती नाही त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी त्यांची बाजू मांडली असेल बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार राहू शकतो, असंही तटकरे म्हणाले.
अशोक खरात प्रकरणाची खोलवर चौकशी झाली व्हावीच या नराधमाला जितकी कठोरात कठोर शिक्षा द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जावीच. चौकशी तर आता सातपुते नावाच्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी, त्या सक्षम पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात एसआयटी तपास करतेय. तपास खोलवर व्हावा, तो जनतेसमोर यावा, कायद्यासमोर लवकरात लवकर जावा. संबंधित असणाऱ्यांवर कारवाई करावी याबाबत कोण्याच्या मनात संदेह असण्याचं कारण नाही, असं सुनील तटकरेंनी म्हटलं.
अशोक खराटा यांना एकदा भेटलो
एसआयटीची चौकशी खोलवरपणे केली जाते. एसआयटीतून सत्य बाहेर येईल, त्यात संदेह असण्याचं कारण नाही. एसआयटी वेगानं तपास करतेय, अनेक महिलांच्या आयुष्याचा भाग आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरु होऊन, फास्ट ट्रॅक कोर्टातून जे करायचं असेल, न्यायव्यवस्थेतला भाग असेल तो कठोरात कठोर करावा, असं सुनील तटकरेंनी म्हटलं.
अशोक खरातसोबत अनेक राजकीय पक्षातील नेत्यांचे फोटो आले आहेत. माझाही आहे मी नाही कधी म्हटलं. कोणाची ओळख असणं, कार्यक्रमाला जाणं याचा ती व्यक्ती विकृतपणे काय करतेय हे माहिती नसते. काही त्यांच्या लग्न विवाह किंवा कुठल्या समारंभासाठी गेले असतील. काही जण मंदिरात गेले असतील. याचा अर्थ घृणास्पद कृत्यात कोण सहभागी होणं म्हणजे त्या प्रत्येकावर अन्याय होईल, असं सुनील तटकरे म्हणाले.
अशोक खरात सोबत कशी ओळख झाली ते आठवत नाही. एक दोनदा भेट झाली, लग्नाला गेलो होतो, तो भाग वेगळा आहे. माझ्यासह अनेकांच्या भेटी झाल्या, असं सुनील तटकरेंनी म्हटलं. पोलिसांनी त्या प्रकरणाची योग्यपणे गांभीर्यानं दखल घेतली, योग्य दिशेनं तपास सुरु आहे, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
आणखी वाचा
Comments are closed.