‘चार बॉटल व्होडका’! हनी सिंहला गाणं गायला विरोध, चंदीगडमधून पुणे पोलिसांना पत्र, म्युझिकल कॉन्
पुणे: पुण्यात येत्या ४ तारखेला आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंग (yo yo honey singh) यांच्या म्युझिकल कॉन्सर्टभोवती वाद निर्माण झाला आहे. शहरातील महालक्ष्मी लॉन्स येथे होणाऱ्या या कार्यक्रमासंदर्भात चंदीगड येथील एका व्यक्तीने थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. या तक्रारीमुळे कार्यक्रमाच्या आयोजनावर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(yo yo honey singh)
संबंधित व्यक्तीने आपल्या पत्रात हनी सिंगच्या ‘चार बॉटल व्होडका’ आणि ‘मिलियनएर’ या गाण्यांवर आक्षेप घेतला आहे. या गाण्यांमधून तंबाखूजन्य पदार्थांचा प्रचार आणि अप्रत्यक्ष प्रसार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषतः या कार्यक्रमात १८ वर्षांखालील तरुणांनाही प्रवेश दिला जात असल्याने अशा गाण्यांचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही गाण्यांचे सादरीकरण कार्यक्रमात रोखण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.(yo yo honey singh)
हनी सिंगने स्टेजवर कार आणल्याची घटना
यासोबतच कार्यक्रमादरम्यान स्टेजवर कोणत्याही प्रकारचे वाहन आणू नये, अशीही स्पष्ट सूचना आयोजकांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात हनी सिंगने स्टेजवर कार आणल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, तसेच अपघाताची शक्यता वाढू शकते, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात अशा प्रकाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.(yo yo honey singh)
दरम्यान, मुंबईतील कार्यक्रमादरम्यान परवानगीशिवाय लेझर लाईटचा वापर केल्याचा आरोप झाल्याने तो कार्यक्रमही वादात सापडला होता. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कॉन्सर्टकडे अधिक सतर्कतेने पाहिले जात आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेची काटेकोर व्यवस्था, तसेच नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. या तक्रारीनंतर पुणे पोलिस आणि संबंधित प्रशासन यावर काय निर्णय घेणार, कार्यक्रमात काही निर्बंध लागू केले जाणार का, किंवा आयोजकांकडून काही बदल केले जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होणार की वादामुळे काही अडचणी निर्माण होणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.(yo yo honey singh)
चार बॉटल व्होडका आणि मिलेनियर हे गाण्यास मज्जाव करा
मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड येथील एका व्यक्तीने थेट पुणे पोलीस आयुक्त यांना एक पत्र लिहीत यो यो हनी सिंग यांच्या पुण्यात येत्या चार तारखेला होणाऱ्या कार्यक्रमास संदर्भात एक पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये संबंधित व्यक्तीने यो यो हनी सिंग ची दोन गाणी ज्यामध्ये चार बॉटल व्होडका आणि मिलेनियर हे गाण्यास मज्जाव करावा अशी विनंती करण्यात आली आहे. हनी सिंग याच्या कार्यक्रमाला अठरा वर्षांपेक्षा कमी असलेल्या तरुणांना सुद्धा प्रवेश दिला जातो मात्र त्याच्या या दोन गाड्यांमधून तंबाखूजन्य भारताचा प्रचार आणि प्रसार होत असल्याने तातडीने आयोजकांनी आणि पोलिसांनी यास मज्जाव घालावा अशी विनंती करण्यात आली आहे.
संबंधित व्यक्तीने आणखी एका पत्रामध्ये यो यो हनी सिंग ला पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये स्टेजवर कोणतेही वाहन आणू या संदर्भात देखील आयोजकांना आणि पोलिसांना पत्र लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वी हनी सिंग याचा मुंबईत एक कार्यक्रम झाला ज्या वेळेला त्यांनी स्टेजवर चक्क एक कार आणली होती. थेट स्टेजवर कार घेऊन आणली गेली तर दुर्घटना होऊ शकते तसंच जीवितहानी सुद्धा होऊ शकते यामुळे त्याला याबद्दल सूचना द्यावी अशी देखील विनंती चंदीगड येथील एका व्यक्तीने केली आहे
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या यो यो हनी सिंग चा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या कार्यक्रमादरम्यान परवानगी नसताना सुद्धा लेझर लाईट लावण्यात आल्यामुळे या कार्यक्रमावर अनेकांनी आक्षेप घेतला होता
आणखी वाचा
Comments are closed.