बॅटने मारहाण करणाऱ्या बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याकांडानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर बीडमधील (beed) गुन्हेगारी आणि मारहाणीच्या अनेक घटना समोर आल्या. त्यापैकीच एक म्हणजे सतीश उर्फ खोक्या याच्याकडून बॅटने मारहाण करतानाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. या घटनेनंतर खोक्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, न्यायालयाकडून आता खोक्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड न्यायालयाने (Court) मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसले याने गतवर्षी एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. काल बीड न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर तो आज कारागृहातून बाहेर आला आहे. कारागृहातून बाहेर येताच त्याचा मित्रपरिवार त्याच्या स्वागताला कारागृहाबाहेर होता. विशेष म्हणजे, कारागृहातून बाहेर आल्यानंतरही गाडीत बसून बीडकडे येतानाचा रिल्स व्हिडिओ त्याने बनवला आहे.
दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्याला गतवर्षी मार्च 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. सतीश भोसले हा सुरेश धस यांना जवळचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे, संतोष देशमुख प्रकरणात आवाज उठवणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्यावर देखील त्यावेळी टीका झाली होती. तसेच, सतीश भोसले याला अटक झाल्यानंतर त्याच्या इतरही गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामध्ये,वन्यजीव शिकार केल्याबाबतही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.