शरद पवार निवडणूक लढणार नाहीत, पण…; बारामती, राहुरीच्या पोटनिवडणुकीवर संजय राऊतांचं मोठं विधान
पुणे : राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा (Baramati and Rahuri By Election) पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेत दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर आली आहे. (Baramati and Rahuri By Election) तर या दोन्ही मतदारसंघात मित्रपक्षांशी चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचं काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, तर याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांनी बसून निर्णय घ्यावा लागेल बारामती मध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही पण त्या ठिकाणी जर कोणी इतर लढत असतील तर त्यांना आपण विरोध करता कामा नये, असंही संजय राऊतांनी पुढे म्हटलं आहे.
sanjay raut on rahuri baramati bypolls : ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षांना लढावं
राहुरी आणि बारामती मध्ये आता पोट निवडणूक आहेत आमचा प्रयत्न आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच निर्णय घेतला पाहिजे, राहुरी मध्ये याआधी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्ता तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीने लढली होती आता मला नक्की माहिती नाही पण त्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अधिकार आहे, काँग्रेस बिहार असेल पश्चिम बंगाल असेल नागालँड असेल अशा सगळ्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि निकाल लागल्यानंतर कळतं की आपण कुठे आहोत ते कुठे आहेत ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षांना लढावं हा महाविकास आघाडीचा एक आधार आहे.
sanjay raut on rahuri baramati bypolls : कौटुंबिक धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही पण…
राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद असल्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांनी बसून निर्णय घ्यावा लागेल बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही पण त्या ठिकाणी जर कोणी इतर लढत असतील तर त्यांना आपण विरोध करता कामा नये. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा संदर्भात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बसून निर्णय घेतील आणि तो घ्यावा लागेल. राहुरी मध्ये लढण्याची आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण भाजपला मदत होईल अशी भूमिका कुणी घेऊ नये असा महाविकास आघाडीचा निर्णय आहे.
rahuri baramati bypolls : मित्रपक्षांशी चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
तर काँग्रेस पक्षाच्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, स्थानिक पातळीवरील समीकरणांचा आढावा घेण्यात आला. इच्छुकांची संख्या लक्षात घेता पक्ष नेतृत्व योग्य उमेदवार निवडण्यासाठी काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन्ही मतदारसंघात मित्रपक्षांशी चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळाली आहे.या निर्णयामुळे बारामती आणि राहुरीतील राजकीय लढती अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, महाविकास आघाडीत जागावाटप आणि रणनीतीबाबतही पुढील घडामोडींना वेग येणार आहे. (Baramati and Rahuri By Election)
rahuri baramati bypolls : 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी ‘या’ दिवशी
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राहुरी आणि बारामतीसाठी 23 एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
rahuri baramati bypolls : बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026
आणखी वाचा
Comments are closed.