भोंदू अशोक खरातच्या लग्नाचा किस्सा; हळदीवेळी शर्टच काढत नव्हता, हादरवणारं कारण समोर

अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचे अनेक काळे कारणामे बाहेर येत असून महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहे. याच भोंदू अशोक खरातची सासुरवाडी आणि त्याची फरार असलेली पत्नी कल्पना खरात हीचं माहेर सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात आहे. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं सिन्नर तालुक्यातील हे पाडळी गाव असून या गावाची लोकसंख्या जेमतेम 1500 ते 1700 इतकी आहे. आणि याच गावात अशोक खरातची सासुरवाडी आहे. अशोक खरातचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर याच गावच्या ग्रामस्थांशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी एका ग्रामस्थांनी अशोक खरातच्या लग्नाचा हादरवणारा किस्सा सांगितला. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातचं ज्यावेळी लग्न झालं, त्यावेळेपासून कल्पनाच्या घराची परिस्थिती हलाखीची होती. सुरुवातीला अशोक खरातचे वय जास्त असल्याने या लग्नाला घरातूनच विरोध होता. अशोक खरातच्या लग्नाला एका भावाचाही विरोध होता. मात्र नंतर हे लग्न कसं जमलं ते कोणालाच माहीत नाही. परंतु 1992-93 साल दरम्यान अशोक खरातचं लग्न झालं. मीदेखील त्या लग्नात होतो. यावेळी हळद लावताना अंगावरचे कपडे काढायला अशोक खरातने नकार दिला. मात्र सगळ्यांनी सांगितल्यावर कपडे काढले, त्यावेळेस अशोक खरातच्या अंगावर वार झाल्याचे दिसून आले, अशी माहिती एका ग्रामस्थाने दिली. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरात यांनी गावकऱ्यांची, नातेवाईकांची प्रतिष्ठा खराब केली- (अशोक खरात प्रकरण नाशिक)

अशोक अशा वागण्यामुळे त्यांचच गाव काय सासुरवाडी आणि नातेवाईकांचे नाव देखील खराब झालं. आता जे समोर आले त्यामुळे त्यांच्यावषयी बोलण्यासारखंच काही राहिलं नाही. आमच्या गावाला केंद्रीय कृषिमंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांचा वारसा आहे. केंद्रीय कृषिमंत्री म्हणून आमच्या गावाचं नाव देशात घेतलं जात होतं. मात्र या अशोक खरातने आमच्या गावाच नाव खराब केलं, अशी संताप एका ग्रामस्थाने व्यक्त केला.

कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून माहेरी गेली नव्हती- (Ashok Kharat Wife Kalpana Kharat)

कल्पना खरात फरार असल्यामुळे एसआयटी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कल्पनाचे माहेर असलेल्या सिन्नर येथील पाडळी येथे जाऊन चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र माहेरच्यांशी कल्पना ही 16 वर्षापासून संपर्कात नाही, तिला अशोक खरात हा कधीही भेटायला येऊ देत नव्हता, अशी धक्कादायक माहिती नातेवाईकांनी दिली. विवाह झाल्यावर कल्पनाने माहेरशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. भावाला देखील कल्पना कधी भेटायला आली नाही, अशी माहिती तिच्या माहेरच्यांनी दिली. तसेच कल्पनाचे माहेरचे लोक तुटपुंज्या शेतीवर उदरनिर्वाह करतात, अशी माहितीही तपासातून समोर आली. (Ashok Kharat Case Nashik)

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: Silent मोड, काही प्रश्न विचारल्यास एकच उत्तर; कायदेतज्ज्ञांचे सांगितली यामागील अशोक खरातची रणनीती

Ashok Kharat Case Nashik Crime News: जरा मोठ्याने बोल…न्यायाधीशांचे 2 प्रश्न; अशोक खरातचे हात जोडून उत्तर, आजच्या सुनावणीत काय काय घडलं? A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.