ऋषिकेश वैद्यची शेंडीबाबत अजब मागणी मान्य; पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला दिले आदेश,नेमकं प

पुणे: एकीकडे नाशिकमधील भोंदु अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण गाजत असतानाच दुसरीकडे वसईतील आपण महादेवाचा अवतार असल्याचं सांगून पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार करणार्‍या ऋषिकेश वैद्य (Rishikesh Vaidya) या भोंदुबाबाचे बिंग फुटले. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजताच तो पसार झाला. पुणे शहर पोलिसांच्या विशेष पथकांसह मांजरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पिंपरी परिसरातून अटक केली आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर न्यायालयाने दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. यावेळी ऋषिकेश वैद्यच्या (Rishikesh Vaidya) वकिलांनी अजब मागणी केली होती. तुरुंगामध्ये वैद्य याचे केशवपन करू नये, अशी मागणी वैद्यच्या वकिलांनी केली होती, त्या मागणीबाबत पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश दिले आहेत, त्यामध्ये भोंदू ऋषिकेश वैद्यची (Rishikesh Vaidya) शेंडी कापू नये असं म्हटलं आहे.

Pune Crime News :  वैद्य यांच्या डोक्यावरील शेंडी ही धार्मिक बाब…

भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य प्रकरणात वैद्यची शेंडी (Rishikesh Vaidya) कापू नये असे आदेश पुणे न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत. दैविशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून वैद्य यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यामुळे वैद्य याला पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली होती. काल त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. यावेळी वैद्य (Rishikesh Vaidya) याच्या वकिलांनी वैद्य यांच्या डोक्यावरील शेंडी ही धार्मिक बाब आहे ती कापू नये अशी विनंती केली, याबाबत अर्ज केल्यांनंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

Pune Crime News :नेमकं प्रकरण काय?

नाशिकमधील अशोक खरातचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुण्यातील विवाहितेने हिंमत करुन हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पीडित महिला ही मुळची पुण्याची आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलेची सोशल मीडियाद्वारे भोंदू ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. वैद्य हा मुळचा वसईतील राहणारा आहे. त्याने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. माझ्या अंगात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची याचे तंत्र तुला शिकवतो, असं त्याने त्या विवाहितेला सांगितलं. २०२३ मध्ये तो पुण्यात आला. त्याने या महिलेची एका लॉजवर भेट घेतली. तिला त्याने गुंगीचे औषध देऊन मी महादेवाचा अवतार आहे. तू माझी पार्वती असं बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला पुन्हा वसईत बोलावले आणि तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता, असा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तो मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. वसई आणि पुणे पोलिस ऋषिकेश वैद्य याचा शोध घेत होते. तो पिंपरी परिसरात असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ऋषिकेश वैद्य याने २०२३ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी ओळख वाढवली. स्वतःला ‘शंकराचा अवतार’ सांगत आणि महिलेला ‘तू माझी पार्वती आहेस’ असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुण्यात भेटीत लॉजमध्ये नेऊन गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच, वसईत पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याचेही महिलेने सांगितले असून त्यानंतर आरोपीने फोटो आणि व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप आहे. २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.(vasai Crime news)

आणखी वाटा – Vasai Bhondubaba: मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती; सोशल मिडीयावर ओळख, वसईच्या भोंदूबाबाने पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं, भोंदूबाबा फरार

आणखी वाचा

Comments are closed.