नाशिकमधील दोन महिला गुन्हेगारांनी गृहभागाला दिले आव्हान; गेल्या 15 दिवसांपासून आरोपी फरार
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील दोन महिला गुन्हेगारांनी गृहभागाला आव्हान दिले असून गेल्या 15 दिवसापासून पोलीस त्यांना पकडू शकलेले नाही. यामध्ये पहिली महिला कल्पना खरात (Kalpana Kharat) आहे. भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची पत्नी कल्पना खरातवर शिर्डी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. अशोक खरातच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने कल्पना खरातची दोन वेळा चौकशी केली. मात्र ज्यावेळी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ती पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाली असून तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
गृहभागाला आव्हान देणारी दुसरी आरोपी महिला निदा खान (Nida Khan) आहे. नाशिकच्या नामांकीत कंपनीमधील महिला अत्याचार आणि धर्मातर प्रकरणातील सूत्रधार असणारी निदा खान 25 मार्चपासून फरार आहे. कंपनीत काम करणार्यांना गरजू मुलींना हेरून एका टोळक्याच्या मदतीने त्यांच्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकणे महिला असूनही इतर मुलीवर अत्याचार, छेडछाड विनयभंगच्या घटनेत गुन्हेगारांना मदत करत विकृत मानसिकतेचे दर्शन घडवल्याने तिच्याविषयी समाजामध्ये संतपाची भावना आहे, तरीही पोलीस या महिलेला अद्याप पकडू शकलेले नसल्याने पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ही नाशिक पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.