क्रीडानगरीतून – राज्य अजिंक्यपद कॅरम : ठाणे अजिंक्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने वाशी येथे सुरू असलेल्या 60 व्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या महिला सांघिक गटात ठाण्याने बाजी मारली. ठाणे संघाने साखळी गटात सर्वाधिक 10 गुणांची कमाई करून प्रथम क्रमांक पटकावला. तर मुंबई संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुंबईने 8 गुणांची कमाई केली होती. शेवटच्या साखळी सामन्यात समृद्धी घाडीगावकरने (ठाणे) सोनाली पुमारीचा (मुंबई)चा 25-0, 25-0 असा पराभव केला. तर मधुरा देवळेने ( ठाणे )अंबिका हरिथला (मुंबई) 25-0, 25-24 असे नमवले. चैताली सुवारे व वीणा चव्हाण ( ठाणे ) जोडीने ऐशा खान व मिताली पाठक (मुंबई) जोडीवर 2-18, 22-4, 25-0 असा विजय मिळवला.

मारवाडी क्रिकेट क्लब उपांत्य फेरीत

मुंबई : 76व्या सालार जंग निमंत्रित टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत मारवाडी क्रिकेट क्लबने मुस्लिम युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा 6 विकेटनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. इस्लाम जिमखान्यावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विनय पुंवरच्या 33 चेंडूंतील नाबाद 64 धावांच्या जोरावर मारवाडी क्रिकेट क्लबने मुस्लिम युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे 183 धावांचे आव्हान 8 चेंडू राखून गाठले. मुस्लिम युनायटेडने 20 षटकांत 5 बाद 182 धावा केल्या होत्या. मारवाडी क्लबच्या पुंवर व्यतिरिक्त, प्रसाद पवार, प्रग्नेश कानपिल्लेवार आणि शाश्वत जगतापने फलंदाजीत चांगले योगदान दिले.

इनडोअर क्रिकेट जिल्हा पंच परीक्षा

मुंबई : क्रिकेटमध्ये खेळाडूंइतकाच सामना वळवण्याचा दम असतो तो पंचामध्ये. अचूक निर्णय, नियमांची जाण आणि धाडस असणाऱयांसाठी मोठी संधी चालून आली आहे. एमआयसीएतर्फे जिल्हा (एल 1) पंच प्रमाणपत्र परीक्षा 1 मे 2026 रोजी होणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून 13 ते 18 एप्रिलदरम्यान अर्ज करणाऱयांना 500 रुपये सवलतीत संधी मिळणार आहे, तर 19 ते 25 एप्रिलदरम्यान शुल्क 1000 रुपये असेल. 26 एप्रिलपासून अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध होईल. तसेच 27 ते 30 एप्रिलदरम्यान दररोज रात्री 8.30 वाजता ऑनलाईन सत्रांमधून परीक्षेचे बारकावे शिकवले जाणार आहेत. परीक्षेच्या अधिक माहितीसाठी https://mahaindorcricket.com/umpire-registration/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

Comments are closed.