होर्मुझनंतर अमेरिकेची नजर आता मलक्काच्या सामुद्रधुनीवर?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव वाढत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझवर वर्चस्वासाठी प्रयत्न सुरू आहेत. जगभरात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा आणखी काही काळ बाधित होण्याची शक्यता आहे. असे असतानाच, आग्नेय आशियातील एका एका घडामोडीने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिका आणि इंडोनेशिया यांच्यातील नवीन संरक्षण करारामुळे चर्चांना उधाण आले आहे की, अमेरिकेचे लक्ष आता जागतिक व्यापाराचे दुसरा महत्त्वाचा मार्ग असलेल्या मलक्काच्या सामुद्रधुनीकडे वळू शकते.

या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या करारानुसार, अमेरिकन लष्करी विमानांना इंडोनेशियाच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवेश मिळाला आहे. या कराराकडे संरक्षण सहकार्य वाढवण्याचे पाऊल अशा दृष्टीने पाहिले जात आहे. असे असले तरी यामुळे मलक्का सामुद्रधुनीवर वॉशिंग्टनची पाळत ठेवण्याची आणि लष्करी हालचालींची क्षमता वाढू शकते. हा जलमार्ग हिंदी महासागराला पूर्व आशियाशी जोडतो. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांकडून संयुक्तपणे या मार्गाचे व्यवस्थापन केले जाते. या सामुद्रधुनीमधून मोठ्याप्रमाणात जागतिक व्यापार सुरू असतो.

अमेरिका आखाताच्या पलीकडे असलेल्या महत्त्वाच्या समुद्री मार्गांच्या सुरक्षेसाठी आपल्या इंडो-पॅसिफिक धोरणात बदल करत आहे का? असा प्रश्न या करारामुळे तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.

कच्चे तेल निर्यातीसाठी होर्मुझ हे केंद्रस्थान मानले जाते. याउलट, मलक्काची सामुद्रधुनी ही अधिक व्यापक व्यापारासाठी ओळखली जाते. इंधन पुरवठ्यासोबतच तयार वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक उत्पादने यांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच या मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्व आशियाई देशांसाठी हा कॉरिडॉर विशेष महत्त्वाचा मानला जातो. चीन या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. चीन मध्ये उद्योग आणि आयात निर्यात क्षेत्रातील अभ्यासक या मार्गाकडे ‘मलक्का डायलेमा’ म्हणून पाहतात. नव्या करारामुळे चीनला अडचणीत आणण्यासाठी अमेरिका या मार्गावर वर्चस्वासाठी उत्सुक असल्याचे देखील बोलले जाते.

Comments are closed.