मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान

मुंबई : देशात नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाची जोरदार चर्चा असून देशपातळीवर राजकीय पक्षांकडून या विधेयकाचे समर्थन केले जात आहे. महिलांना संसदेत आरक्षण देत त्यांचा सहभाग संसदीय राजकारणात वाढविण्याच्या ह्या निर्णयाचं कौतुक होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नारी शक्ती वंदन’ महिला संमेलनाचे मुंबईतील दादर आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात अभिनेत्री रविना टंडन यांचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना रविना टंडन यांनी नारी शक्ती बळकट होत असल्याचे सांगत मोदी सरकारचे कौतुक केले. आजचं सरकार फक्त बोलत नाही, करुन दाखवते. आज आपलं हे संमेलन झालंय त्यातून आपण संसदेत जाऊ आणि देशाला उन्नतीकडे घेऊन जाऊ, असेही रविनाने म्हटले.

भारत महिलांच्या हक्कासाठी सर्वात चांगला देश आहे. कारण, काही देशात महिलांचे हक्क ‘ना’ च्या बरोबर आहेत. केंद्र सरकार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यामुळेच हे शक्य झालं आहे. मुख्यमंत्री देखील इथे आहेत, त्यांनी हे सगळं करुन दाखवलं आहे. काली-चंडीचं रुप आपल्याला महिलांच्या एअरफोर्स, सैन्यात दिसते. अकाऊंटन्ट महिला असतील ज्या बाहेर जातात आणि मेहनत करतात, पैसे कमावतात त्या सगळ्या लक्ष्मी आहेत. पंतप्रधान मोदींनी आम्हाला ती शक्ती दिलीय, ज्यात आपण संसदेत देखील आपला आवाज ठेऊ शकू, असे म्हणत रविना टंडनने मोदी सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नारी शक्ती वंदन’ महिला संमेलनाचे मुंबईतील दादर येथे होत असून या कार्यक्रमात अभिनेत्री रवीना टंडन यांचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना रविना टंडन यांनी नारी शक्ती बळकट होत असल्याचे सांगत मोदी सरकारचे कौतुक केले. आजचं सरकार फक्त बोलत नाही, करुन दाखवते. आज आपलं हे संमेलन झालंय त्यातून आपण संसदेत जाऊ आणि देशाला उन्नतीकडे घेऊन जाऊ, असेही रविनाने म्हटले.

मी किरण बेदींची मोठी फॅन होती, आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेत होतो. आज खूप सोपी गोष्ट झाली आहे, ज्यात आपण एअरफोर्समध्ये जाऊ शकतो, सैन्यात जाऊ शकतो. माझी इच्छा होती मी पण आयएएस बनू शकू, असेही रविनाने म्हटले. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भावना होती, लोकं महिलांना अंडरइस्टिमेट करतात. अरे ही गृहिणी आहे, मात्र ती तिच्या दैनंदिन आयुष्यात सगळ्याच भूमिका करत असते, असे म्हणत रविनाने महिलांना कोणीही हलक्यात घेऊ नये, असेच सूचवले.

प्राजक्ता माळीकडूनही PM मोदींचे अभिनंदन

नारी शक्ती वंदन अधिनियमनला समर्थन देण्यासाठी आपण इथे आलो आहोत. मला अभिमान आहे मी महाराष्ट्रात जन्मले. सध्या सरकारडून भगिरथ प्रयत्न ह्या अधिनियमासाठी होत आहेत, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप अभिनंदन. मी याआधी काही वर्ष जन्मले असते तर कठीण होतं, मला जमलंच नसतं. काही वर्षांआधी महिलांचे मोठे हाल होते. मात्र, आता काही वर्षात महिलांना पुढे आणण्यासाठी अनेक योजना आणि अनेक प्रयत्न झाले आहेत, असे अभिनेत्री प्राजक्ता माळीने म्हटले. महिलांना उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी आपण झटले पाहिजे, समान हक्क अधिकार द्या, हा नारा आहे, मी मागणी चुकीचीच आहे. सनातन धर्माने ते आपल्याला दिलेलेच आहेत. आता, यासाठी झगडा करावा लागतोय, ठिकंय तो काही प्रमाणात असेलच. आपण आता राखेतून फिनिक्ससारखॅ उभं राहिला पाहिजे. मागण्या करणं, आवाहन करणं यापेक्षा स्वत:ला सिद्ध करणं हा मला नारा वाटतो. प्रत्येक नारी शक्तीत ती शक्ती आहे, तिला सजग करायचे आहे आणि पुढे न्यायचं आहे, असे प्राजक्ता माळीने म्हटले.

प्राजक्ता माळीकडून फडणवीसांचे कौतुक

पुरुष प्रधान संस्कृती आहे असं आपण मान्य करतो. महिलांना आपण देवी मानतो, मात्र घरी जातो, कामावर असतो तेव्हा विसरतो. महिलांवर दबाव आणतो, टिका-टिप्पणी करतो, टोमणे मारतो, यातून महिलांचे खच्चीकरण होतं असं मला वाटतं. मात्र, महिलांना पुरुषांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्ही न्यूट्रल राहा, त्यापुढे जातील. भोंदूबाबा प्रकरण मुख्यमंत्री यांनी अत्यंत कठोरपणे हाताळले, महाराष्ट्रातील प्रत्येकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकलं पाहिजे, महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे हे शिकलं पाहिजे, असे म्हणत प्राजक्ता माळीने देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले.

हेही वाचा

लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश

आणखी वाचा

Comments are closed.