‘अंक’गणितच भोंदू खरातच्या आलं अंगलट…! स्वत:च्या कारचा नंबर ‘त्या गोष्टीवरून’ निवडायचा, नेमक

नाशिक: नाशिकच्या भोंदू खरातच्या (Ashok Kharat) कारनाम्यांची चर्चा सध्या राज्यभरात दिसून येत आहे, अंकशास्त्रामध्ये निपून  असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात  (Ashok Kharat) आपल्या स्वतःसाठी ९ अंक हा शुभांक असल्याचं मानत होता. त्यामुळेच त्याच्या दोन्ही कारसाठी त्याने आरटीओमधून ९ अंक होणारे ‘चॉइस’ नंबर घेतल्याचे तपासातून समोर आले आहे. खरात याने अंकशास्त्र व भविष्य याचा दावा करत अनेक बड्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना आणि सामान्य लोकांना देखील गंडा घालण्यासह महिलांचे लैंगिक शोषण केल्याने धक्कादायक सत्य समोर आल्यानंतर त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. (Ashok Kharat)

खरातला ताब्यात घेतल्यापासून सुरू झालेल्या तपासात आणि एसआयटीने जारी केलेल्या हेल्पलाईनद्वारे अनेक महिलांनी, व्यवसायिकांनी खरातच्या कारनाम्याच्या तक्रारी केल्या आहेत. आता खरातच्या अंकाचा खेळ आता त्याच्यावरच उलटला आहे. खरात याच्या नऊ या शुभांकाबाबत अनेक बाबी समोर आल्या आहेत. एका व्यावसायिकाकडून भीती घालून घेतलेल्या मर्सिडिजमधून तो सर्वत्र फिरत होता.  (Ashok Kharat)

Ashok Kharat Case: ….म्हणून ‘९’ अंकाला पसंती

अंकशास्त्रानुसार ९ अंकाला मोठं महत्त्व आहे. ९ अंक हा बंधुत्व, वैश्विक कल्याण, पैसा, भाग्य, प्रवास, खेळ आणि घटनांची पूर्तता यांचे प्रतीक आहे मानला जातो. तसेच ९ हा अंक समृद्धी, औदार्य आणि मानवतावादी कार्याशी जोडलेला आहे असेही मानले जाते. तसेच पैसा आणि समृद्धी आकर्षित करण्याशी संबंधित असलेला अंक ९ आहे, असेसुद्धा अंकशास्त्रानुसार मानण्यात येते. अंकशास्त्रानुसार, ९ या अंकाचा अधिपती ग्रह मंगळ असल्याचे सांगितले जाते.

अशोक खरात प्रकरण : इतर गड्यांचेही '9' कनेक्शन

खरातच्या घराच्या आवारात उभ्या असलेल्या इतर गाड्यांवरही ईडीची नजर आहे. तेथे असलेल्या एका वाहनाचा नंबर (6453) याची बेरीजही (6+4+5+3 = 18, 1+8 = 9) नऊच येते. यावरून खरातने भोंदूगिरीच्या माध्यमातून कमावलेल्या पैशातून कशा प्रकारे लक्झरी जीवनशैली आणि अंधश्रद्धेचा बाजार मांडला होता, हे स्पष्ट होते. सोमवारी दिवसभर खरातच्या विविध मालमत्तांची तपासणी केल्यानंतर ईडीने मोठी कारवाई केली. खरातने आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे आणि या पैशांचा विनियोग कुठे केला आहे? याचा शोध आता घेतला जात आहे. बांधकाम व्यावसायिक जासूद यांच्याप्रमाणेच इतरही बड्या व्यक्ती खरातच्या जाळ्यात अडकल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशोक खरात प्रकरण: स्वयंघोषित 'ज्योतिषी' अशोक खरातची खारी कुंडली सामोर

“दहावी नापास, कोंबडी चोरीचा आरोप आणि बनावट कॅप्टनपद… हे वास्तव आहे नाशिकच्या भोंदू अशोक खरातचे (Ashok Kharat)! ज्याने स्वतःच्या नावापासून शिक्षणापर्यंत सर्वच गोष्टी खोट्या सांगून भक्तांना लुटले, त्या खरातच्या (Ashok Kharat) आयुष्याची कुंडली आता नाशिक पोलिसांनी मांडली आहे. त्याच्या कहांडळवाडीतील बालपणापासून ते ईशान्येश्वर मंदिराच्या उभारणीपर्यंतचा हा ‘असाही’ बायोडेटा नक्कीच थक्क करणारा आहे.”(Ashok Kharat)

नाव : लक्ष्मण एकनाथ खरात

गावाचा पत्ता : कहांडळवाडी (शिवाजीनगर) ता. सिन्नर, जि. नाशिक

बदललेले नाव : अशोककुमार एकनाथ खरात

पत्ता : मिरगाव, ता. सिन्नर आणि तृप्तबाला, कर्मयोगीनगर, गोविंदनगर, नाशिक

जन्मतारीख : १ जून १९६५ (शाळेच्या दाखल्यानुसार)

शिक्षण : दहावी नापास (मार्च १९८३)

सासुरवाडी : पाडळी, ता. सिन्नर

मुलं: एक मुलगा, दोन मुली

कहांडळवाडी ता. सिन्नर येथे बालपणाचा काळ गेला. लहानपणापासून बिलंदर स्वभाव. गावातील शेतकऱ्यांच्या कोंबड्या-अंडी चोरण्याच्या तक्रारी. १९८३-८४ च्या सुमारास कोंबडी चोरीच्या प्रकरणात रंगेहात पकडला. त्यानंतर अनेक वर्षे बेपत्ता. काही काळ हाँगकाँगमध्येही वास्तव्याची चर्चा.

मूळ गावी परतला १९९४-९५ च्या सुमारास. त्यावेळी नौदलात कॅप्टन असल्याची बढाई. सिन्नरमध्ये काही काळ एका खासगी अकॅडमीत नोकरी. याचवेळी ज्योतिषाचा अभ्यास असल्याचा दावा करत लोकसंवाद-संपर्क वाढविला.

नाशिकला वास्तव्य: नाशिक येथे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय, कॅनडा कॉर्नर भागात ओकस प्रॉपर्टी डिलर्स अॅण्ड डेव्हलपर्सची स्थापना व कार्यालयाची उभारणी. याठिकाणाहूनच व्यवसायाबरोबरच ज्योतिष, तंत्र-मंत्र विद्येचे प्रकार.

ईशान्येश्वर मंदिराची उभारणी: साधारणपणे २००८-०९ मध्ये मिरगाव ता. सिन्नर येथे ईशान्येश्वर मंदिराची उभारणी. तसेच १३ ऑगस्ट २००९ रोजी शिवनिका ट्रस्टची नोंदणी व स्थापना. ट्रस्टवर स्वतः अध्यक्ष व विश्वस्त मंडळाची नियुक्त्ती.

देश-विदेशात फिरला राहिला: सुमारे १५४ देशांची भ्रमंती केल्याचा दावा. केंद्र व राज्य सरकारमधील अनेक आजी माजी मंत्रीगण तसेच राजकीय नेते-सेलेब्रिटी यांच्याशी निकटचा संबंध आला.

१८ फेब्रुवारी २०२६ : खरातकडे कामाला असलेल्या नीरज जाधव याच्याविरूद्ध एका तरुणीची छायाचित्र व व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत असल्याची शिर्डी पोलिसात तक्रार. तेथून अहिल्यानगर पोलिसांकडून सखोल तपास सुरू झाला.

१७ मार्च २०२६ : अशोक खरात यास नाशिक पोलिसांकडून महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून अटक. सध्या पोलिस कोठडीत. राज्य सरकारकडून एसआयटीमार्फत तपास सुरू झाला.

आता या सर्व प्रकरणाचा एसआयटी तपास सुरू आहे, एसआयटीने जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवरती अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

आणखी वाचा  – Ashok Kharat Case: ‘मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल’, अशोक खरातने बांधकाम व्यावसायिकाकडून लाटलेली आलिशान कार, 90 लाख किंमत अन् 9 नंबरचं ‘ते’ खास कनेक्शन

Ashok Kharat: राजकारणी आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित ‘ज्योतिषी’ अशोक खरातची खरी कुंडली समोर; दहावी नापास अन् अंडीचोर

Comments are closed.