ठाणे, पुणेपासून सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरपर्यंत…; विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार
विधान परिषद निवडणूक 2026 मुंबई: विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. तर अडीच वर्षापासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांचीही निवडणूक लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याने विधान परिषदेच्या 17 जागा भरण्यासाठी हालचाली सुरू आहेत. 17 मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भातला अहवाल लवकर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. 20 जिल्हा परिषदाची निवडणूक बाकी असली तरी परिषदेच्या 17 जागांची निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
पुढील मतदारसंघात होऊ शकते निवडणूक- (Vidhan Parishad Election 2026)
सोलापूरअहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणेभंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर–बीडपरभणी-हिंगोली, छत्रपती संभाजी नगर-जालना, नागपूर.
विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार- (Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं असल्यामुळे महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Vidhan Parishad Election 2026)
- उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
- नीलम गोऱ्हे (शिवसेना)
- शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
- अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
- गोपीचंद पडळकर (भाजप)
- रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
- राजेश राठोड (काँग्रेस)
- प्रवीण दटके (भाजप)
- रमेश कराड (भाजप)
विधानसभेत कोणाचे संख्याबळ किती? (Maharashtra BJP Shivsena NCP Congress MLA)
- भाजप- 132 – 1 = 131
- शिवसेना (शिंदे गट)- 57
- राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 – 1 = 40
- काँग्रेस- 16
- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
- शिवसेना (ठाकरे गट)- 20
- समाजवादी पक्ष- २
- जनसुराज्य शक्ती- 2
- राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
- राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
- एमआयएम- 1 जागा
- सीपीआय (एम)- 1
- पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
- राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
- अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)
- महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
- माविया = 16+10+20+2+1 = 49
- इतर = 03
- एकूण = 286 आमदार
महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात- (Vidhan Parishad Election 2026)
दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.