बार्सिलोना बाहेर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एफसी बार्सिलोना संघाला युरोपियन यूईएफए चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच मोठा धक्का बसला. अॅटलेटिको माद्रिदने एकूण 3-2 अशा एकत्रित (ऑग्रिगेट) आघाडीवर विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. पहिल्या लेगमध्ये अॅटलेटिकोने 2-0 अशी आघाडी घेतली होती, जी अखेर निर्णायक ठरली. मात्र याचबरोबर बार्सिलोना संघाचे चॅम्पियन्स लीगमधील आव्हान संपुष्टात आले. दुसऱ्या लेगमध्ये बार्सिलोनाने 2-1 असा विजय मिळवला, मात्र तो अपुरा ठरला. सामन्याच्या सुरुवातीलाच लॅमिने यामलने चौथ्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 24 व्या मिनिटाला फेरॅन टोरेसने डॅनी ओलमोच्या पासवर दुसरा गोल करत स्कोअर 2-0 केला. मात्र 31 व्या मिनिटाला एडेमोला लुकमनने मार्कोस लॉरेंटेच्या पासवर गोल करत अॅटलेटिकोला पुनरागमन करून दिले. हा गोलच ऑग्रिगेटच्या दृष्टीने निर्णायक ठरला. दुसऱ्या सत्रात बार्सिलोनाला काही संधी मिळाल्या, परंतु त्यांना यश मिळाले नाही.

Comments are closed.