5 सामने, पण विकेट्स 0…, जसप्रीत बुमराहला विकेट का मिळत नाहीय?; इरफान पठाणने सांगितली नेमकी चू

IPL 2026 मध्ये जसप्रीत बुमराह 5 सामन्यात 0 विकेट्स: आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची जादू पूर्णपणे ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या धारदार यॉर्कर आणि अचूक टप्प्यासाठी ओळखला जाणारा बुमराह या हंगामात चक्क विकेट्ससाठी संघर्ष करतोय. पाच सामने झाले बुमराहच्या नावावर एकही बळी नसल्याने क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

का अपयशी ठरतोय बुमराह? इरफान पठाणने सांगून टाकलं (Jasprit Bumrah IPL 2026)

गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही बुमराहने 41 धावा दिल्या, पण त्याला एकही यश मिळाले नाही. सलग पाचव्या सामन्यात तो रिकाम्या हाताने परतला आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने बुमराहच्या या खराब फॉर्ममागचे कारण स्पष्ट केले आहे. इरफानच्या मते, बुमराह आपल्या सर्वात मोठ्या शस्त्राचा म्हणजेच वेगाचा वापर कमी करत आहे.

“बुमराहच्या फॉर्ममध्ये फार मोठी अडचण नाही, पण तो खूप जास्त संथ (Slower) चेंडू टाकत आहे. या हंगामात त्याचा सरासरी वेग ताशी 130 किमीच्या आसपास राहिला आहे. तो जवळपास 44 टक्के स्लोअर चेंडू टाकत आहे, म्हणजेच दर दुसरा चेंडू हा कमी गतीचा आहे,” असे इरफानने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले.

इरफान पुढे म्हणाला की, “बुमराहला प्रशिक्षणाची गरज नाही, पण त्याला त्याच्या रणनितीत बदल करावा लागेल. जर त्याने चेंडूचा वेग वाढवला आणि स्लोअर बॉल्सचे प्रमाण कमी केले, तर त्याला नक्कीच यश मिळेल. हे गणित अगदी साधे आहे, जे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.”

मुंबई इंडियन्सची चिंता वाढली (Mumbai Indians IPL 2026)

मुंबई इंडियन्ससाठी बुमराह हा केवळ गोलंदाज नसून तो विजयाचा कणा आहे. पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेणे आणि डेथ ओव्हर्समध्ये धावा रोखणे यात बुमराहचा हात कोणीही धरू शकत नाही. मात्र, तोच जर विकेटलेस राहत असेल आणि धावा लुटवत असेल, तर मुंबईच्या प्ले-ऑफच्या आशांना मोठा धक्का बसू शकतो. आगामी सामन्यांमध्ये बुमराह पुन्हा आपल्या जुन्या ‘वेगा’ने फलंदाजांच्या दांड्या गुल करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा –

Mumbai Indians IPL 2026 : पराभवानंतर मुंबईच्या संघात फूट? बुमराह-हार्दिकमध्ये भर मैदानात ठिणगी, व्हायरल व्हिडिओमुळे सगळेच चक्रावले

आणखी वाचा

Comments are closed.