डगआऊटमध्ये मोबाईल वापरला, BCCIने अखेर निकाल लावला; राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर कडक कारवाई, जाण

राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर: आयपीएल 2026 दरम्यान नियमभंगाचा मोठा मुद्दा समोर आला, जेव्हा राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरने डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्यामुळे वाद निर्माण झाला. प्रकरण इतकं वाढलं की बीसीसीआयला हस्तक्षेप करावा लागला आणि अखेर कठोर कारवाईही करण्यात आली.

राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंडर यांच्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात डगआउटमध्ये फोन वापरल्याबद्दल बीसीसीआयने 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, त्यांना निलंबनापासून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुष्टी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना केली. त्यांनी सांगितले की अँटी-करप्शन युनिट (ACSU) रोमी भिंडर यांच्या स्पष्टीकरणावर पूर्णपणे समाधानी नव्हती.

डगआउटमध्ये फोन वापरण्यास मनाई (Rajasthan Royals manager Romi Bhinder)

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसांनी बीसीसीआयने भिंडर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि 48 तासांत उत्तर मागितले. अलीकडे त्यांच्या तब्येतीबाबत काही अडचणी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, त्यामुळे त्यांनी फोन वापरल्याचे सांगितले. मात्र, आयपीएलच्या नियमांनुसार टीम मॅनेजर फोन वापरू शकतात, पण पीएमओए क्षेत्र म्हणजेच डगआउटमध्ये त्यास परवानगी नाही. फोनचा वापर फक्त ड्रेसिंग रूममध्येच करता येतो. त्यामुळे हा प्रोटोकॉलचा भंग मानण्यात आला.

1 लाखांचा दंड, इशारा कायम (Romi Bhinder News IPL 2026)

देवजीत सैकिया यांनी सांगितले की, हा भिंडर यांचा पहिलाच नियमभंग असल्याने त्यांच्यावर 1 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आणि भविष्यात अधिक काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला. तसेच त्यांनी सर्व संबंधितांना नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

पुढील सामना KKR विरुद्ध (GT vs KKR IPL 2026)

प्रकरण शांत झाल्यानंतर आता राजस्थान रॉयल्सची नजर पुढील सामन्यावर आहे. 19 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स चा सामना कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध ईडन गार्डन्स येथे होणार असून, संघ पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करणार आहे.

हे ही वाचा –

Mumbai Indians Playoffs Scenario IPL 2026 : पाचवेळा चॅम्पियन, पण आता मिशन इम्पॉसिबल…; प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोर एकच अट, काय आहे समीकरण?

आणखी वाचा

Comments are closed.