GT vs KKR: सामन्यापूर्वी गुजरातला धक्का; 'हा' स्फोटक खेळाडू IPL 2026 मधून बाहेर, बदली खेळाडूची घोषणा
आयपीएल (IPL) 2026 च्या दरम्यान गुजरात टायटन्ससाठी (Bad news for GT) एक वाईट बातमी समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघाचा एक मुख्य खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण सीझनमधून बाहेर झाला आहे, ज्यामुळे संघाच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो.
गुजरात टायटन्सचा 25वा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे, पण त्याआधीच इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज टॉम बँटन (Tom banton) बोटाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे, या सीझनमध्ये त्याला अद्याप पदार्पणाची संधीही मिळाली नव्हती. फ्रँचायझीने त्याच्या जागी 24 वर्षांच्या कॉनर एस्टरहुइजनला संघात सामील करून घेतले आहे.
गुजरात टायटन्सने टॉम बँटनला 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत (Base Price) खरेदी केले होते. या सीझनमध्ये संघर्ष करणाऱ्या गुजरातच्या मधल्या फळीला बँटन मजबुती देईल, अशी आशा होती. मात्र, मैदानात उतरण्यापूर्वीच तो बाहेर झाल्याने मॅनेजमेंटने तातडीने त्याचा पर्याय जाहीर केला.
फ्रँचायझीने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, बँटनच्या जागी आलेला एस्टरहुइजन 75 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर संघात सामील होईल. त्याने SA20 लीगचे तिन्ही सीझन खेळले आहेत. अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, जिथे सलग दोन अर्धशतके झळकावून तो ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ ठरला होता. या सीझनमध्ये गुजरातची कामगिरी संमिश्र राहिली आहे. 4 सामन्यांपैकी 2 विजय आणि 2 पराभवांसह संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. आता त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी आहे, जो संघ अद्याप आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
Comments are closed.